क्राईमभुसावळ

भुसावळ तालुक्यातील आठ महिन्याच्या बाळाच्या अपहरण प्रकरणी पाच आरोपींना अटक

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l साकेगाव तालुका भुसावळ येथील अरविंद्र अर्जून भिल या आठ महिन्यांच्या बाळाला रात्रीच्या वेळेस घरात झोक्यात झोपलेला असताना उचलून नेऊन अपहरण केल्याची घटना मंगळवारी २३ एप्रिल रोजी समोर आली. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील अरविंद्र अर्जून भिल.वय-८ महिने रा. साकेगाव ता. भुसावळ या लहान बाळाला
मंगळवारी २३ एप्रिल रोजी मध्यरात्री २ वाजेच्यां दरम्यान
घरातील झोक्यातून उचलून अपहरण केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात स्थानिक गुन्हे शाख आणि भुसावळ तालुका पोलीसांनी गोपनिय माहितीद्वारे पाच संशयित आरोपींना अटक करण्यात यश आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आज सोमवारी २९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषदेत दिली.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी संबंधित विभागाला कारवाईच्या सुचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील आणि भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन जगताप यांनी पथक रवाना केले. पथकाने गोपनिय माहितीच्या आधारे भुसावळ शहरातील नारायण नगर मोरया हॉटेलच्या समोर असलेले अलका जीवन स्पर्श फाऊंडेशन या ट्रस्टवर छापा टाकला. त्यात अपहरण झालेले आठ महिन्याचे बाळ मिळून आले . या गुन्ह्यात पोलीसांनी दिपक रमेश परदेशी वय ३२ रा. नारायण नगर, भुसावळ, अमीत नारायण परिहार वय ३० रा. नागसेन कॉलनी, कंडारी ता. भुसावळ, कुणाल बाळू वाघ वय १९ रा. साकेगाव ता. भुसावळ, बाळू पांडूरंग इंगळे वय ५१ रा. वरणगाव ता. भुसावळ आणि रिना राजेंद्र कदम वय ४८ रा. नारायण नगर, भुसावळ या पाच जणांना अटक करण्यात आले आहे. शिवाय या गुन्ह्यातील एक आरोपी आणि दोन विधीसंघर्षीत बालकाचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर अटकेतील बाळू इंगळे हा नंदूरबार जिल्हा पोलीस दलात पोलीस हवलदार म्हणून कार्यरत असल्याचे समोर आले आहे.

या कारवाईत पोलीस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, विभागीय पोलीस अधिकारी कृष्णकांत पिंगळे, पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, पो.नि. बबन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विशाल पाटील,पोलीस उपनिरीक्षक वाघमारे, सहाय्यक फौजदार विठ्ठल फूसे, पोहेकॉ  प्रेमचंद सपकाळे, वाल्मिक सोनवणे, युनूस शेख,संजय भोई, संजय तायडे,दिलीप जाधव, पो.ना. राहुल महाजन,नितीन चौधरी, जगदीश भोई,  सहाय्यक फौजदार सादीक शेख, पोहेकॉ उमाकांत पाटील, रमन सुरळकर, योगेश माळी, प्रशांत परदेशी, योगेश माळी, अमर आढाळे, राहूल भोई, हे सहभागी होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!