भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

कॉलेज प्राचार्यांकडून मित्रांसमोर मारहाण : अपमान झाल्याच्या नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

जळगाव, मंडे टु मंडे न्युज | जळगाव मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात मित्रांसमोरच कॉलेजच्या प्राचार्यांनी कोणताही दोष नसताना पीव्हीसी पाईप ने मारहाण केल्यामुळे अपमान झाल्याच्या भावनेने आलेल्या नैराश्यातून २० वर्षीय फार्मसीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली असल्याची खळबळजनक घटना घडली. श्याम प्रभाकर पाटील, असं आत्महत्या केलेल्या वीस वर्षीय विद्यार्थ्याचे नाव असून या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात संबंधित योगेश पवार नामक प्राचार्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाम प्रभाकर पाटील हा जळगाव येथील श्री. गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी प्राचार्य योगेश पवार यांनी दोष नसताना पीव्हीसी पाईपने मारहाण करून शिक्षक व मित्रांसमोर अपमान केल्याची माहिती श्यामने आपल्या कुटुंबीयांना दिली होती. १४ फेब्रुवारी रोजी त्याने वडिलांना व काकांना फोन करून आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगितले होते. यानंतर नैराश्यातून त्याने नेहरूनगर येथील राहत्या खोलीवर गळ्याला दोर लावत गळफास घेत टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.

दरम्यान, पोलीस तपासात घटनास्थळावरून पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली असून त्यात प्राचार्यांनी मारहाण केल्याचा उल्लेख आहे.या प्रकरणी मृत शाम पाटील याचे वडील प्रभाकर पाटील यांच्या तक्रारीवरून प्राचार्यां योगेश पवार यांचे विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांची सुसाईड नोट आम्ही जप्त केली असून प्राचार्य विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती रामानंद पोलिसांनी दिली. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!