भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

सामाजिक

फैजपूर शहरात अवैध नळ कनेक्शन : पाणी प्रश्न पेटणार, दरमहा रु.५०० प्रमाणे विकले जातेयं पाणी..?

फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | गेल्या अनेक वर्षापासून फैजपूर शहरात बहुतेक भागामध्ये अवैध नळ कनेक्शनचा मोठ्या प्रमाणात होत असलेला गैरवापर आणि व्यवसायामुळे शहरात पाणी प्रश्न पेटणार असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या तापमानामुळे प्रशासकीय यंत्रणा फैजपूर शहरात पिण्याच्या पाण्याचे नियोजन सुरू आहे परंतु बोगस नळ कनेक्शन मुळे मोठ्या अडचणी येत आहेत. फैजपूर शहरात शेकडो अवैध नळ कनेक्शन आहेत. या बोगस अवैध नळ कनेक्शन ची चौकशी करून जिल्हाधिकारी मार्फत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे

फैजपूर शहरात मोठ्या प्रमाणावर काही भागांमध्ये बोगस नळ कनेक्शन आहे. अवैध पणे पिण्याच्या पाण्याचा वापर करत अनेकांनी व्यवसाय सुरू केलेला आहे.ज्या लोकांचे अवैध नळ कनेक्शन आहे तेच लोक पाण्याचा तुटवडा आला की नगरपालिकेत भानगडी करतात.

अवैध  नळ कनेक्शन मुळे दर उन्हाळ्यात पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत असते फैजपूर नगर पालिकेवर गेल्या ४ वर्षापासून प्रशासकीय राजवट सुरू आहे.प्रशासकीय राज मध्ये काही भागांमध्ये नगरपालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांनी काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध नळ कनेक्शन खोदून मनमानी केलेली आहे.

आणि त्याच अवैध( बिना परवानगीने )घेतलेल्या नळ कनेक्शन वरून ज्यांना पाण्याची आवश्यकता असते त्यांचे कडून दरमहा ५०० रुपये सर्रास घेतले जातात. म्हणजे आधीच अवैध नळ कनेक्शन, त्यातच पाण्याची दरमहा ५०० रुपये प्रमाणे विक्री, असा व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून असाच सुरू आहे. शेकडो अवैध नळ कनेक्शन मुळे मात्र अधिकृत नळ कनेक्शन धारकांना  याचा बऱ्याच वेळेला पाणी मिळत नसल्याने फटका बसत आहे.

येथील शेकडो अवैध नळ कनेक्शन सुरू असून प्रत्येक उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्यामध्ये वाढ होते परंतु या अवैध कनेक्शन  मुळे अधिकृत नळ कनेक्शन धारकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. मोठ्या प्रमाणावर अवैध पाण्याचा व्यवसाय सुरू असल्यामुळे शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या वाढली आहे आणि नगरपालिकेवर पिण्याच्या पाण्यासाठी अधिकृत नळ कनेक्शन धारकांनाची  मोर्चा सारखी परिस्थिती निर्माण होते शहरातील काही नागरिकांनी या अवैध नळ कनेक्शन बाबत कारवाईची मागणी केलेली असून अध्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे वृत्त आहे

जवळ जवळ ४ वर्षानंतर प्रशासकीय राज संपले आहे.
आता नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. नगरपालिकेने नुकतीच अवैध नळ कनेक्शन बाबत नोटीस बजावली असून अवैध नळ कनेक्शन धारकांवर नगरपालिका काय कारवाई करते हे पुढील काळात समोर येईलच. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीप्रश्न पेटणार असल्याची चिन्ह दिसत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!