ऐनपूर महाविद्यालयात “स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन” संपन्न
ऐनपूर, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि द युनिक अकॅडमी, पुणे शाखा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यासाठी “स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी कशी करावी ” या विषयावर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी भूषविले. कार्यक्रमाच्या सुरवातीला लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने, डॉ. सतीश वैष्णव, डॉ. जयंत नेहेते श्री नरेन्द्र पाटील, प्रा. सुनील देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि सूत्रसंचलन डॉ. सतीश एन. वैष्णव यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक प्रा. सुनील देशमुख, समन्वयक, द युनिक अकॅडमी जळगाव, यांनी आपल्या मार्गदर्शनात एम. पी. एस. सी., यु. पी. एस. सी. व इतर स्पर्धा परीक्षांमार्फत भरल्या जाणाऱ्या विविध पदांची माहिती दिली. तसेच पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी कोणती पुस्तके, मासिके आणि वृत्तपत्रे वाचली पाहिजे, वेळेचे नियोजन कसे करावे याबद्दल विस्तृत माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांना पूर्व आणि मुख्य परक्षेचे स्वरूप समजावून सांगितले.एम. पी. एस. सी., यु. पी. एस. सी. व इतर स्पर्धा परीक्षाच्या तयारी साठी राज्य व केंद्रशासना तर्फे उपलब्ध विविध शिष्यवृत्ती योजना बद्दल माहित दिली.
श्री. नरेंद्र पाटील, शाखा प्रमुख द युनिक अँकडमी जळगाव यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारी साठी उपलब्ध असलेल्या मोबाईल अँप विषयी माहिती दिली.
विद्यार्थ्याशी हितगूज करतांना त्यांच्या विविध शंकाचे निरसन केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांबद्दल जागृती निर्माण करणे ही काळाची गरज आहें, यासाठी महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कार्यरत आहे असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. सतीश एन. वैष्णव यांनी तर आभार प्रा. एस. पी. उमरीवाड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. संदीप साळुंखे, प्रा. केतन बारी, प्रा. हेमंत बाविस्कर व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
