भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

ओरिजनल पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी ; सामाजिक आणि पत्रकारीय प्रश्नांवर सक्रिय चर्चा

सावदा, ता. रावेर.(जळगाव), मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | दि. ७ ऑगस्ट २०२५ रोजी रावेर तालुक्यातील सावदा येथील शासकीय विश्रामगृह येथे ओरिजनल पत्रकार संघ, च्या नवीन कार्यकारिणीची एक मताने निवड करण्यात आली. यावेळी महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. या बैठकीत पत्रकारांच्या मूलभूत प्रश्नांवर सखोल चर्चा करून संघटनेला अधिक बळकट करण्याचा निर्धार करण्यात आला. विशेष म्हणजे, समाजहितासाठी आणि गरजूंसाठी ठोस पावले उचलण्याचा निर्णयही घेण्यात आला.

नवीन कार्यकारिणी खालीलप्रमाणे…
अध्यक्ष : भानुदास भारंबे
उपाध्यक्ष : दिलीप चांदेलकर
कार्याध्यक्ष : युसुफ शहा
सचिव : फरीद शेख
खजिनदार : कैलास लवंगडे
प्रसिद्धी प्रमुख : अजहर खान
सदस्य: दीपक श्रावगे,
सदस्य: मुख्तार शेख,
सदस्य: प्रशांत सरोदे
सदस्य : मिलिंद कोरे

बैठकीत पत्रकारांच्या हितासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अनेक मुद्द्यांवर विचारमंथन झाले. गरजू विद्यार्थ्यांना आणि समाजातील वंचित घटकांना मदत करण्यासाठी संघटने मार्फत विविध उपक्रम राबवले जाणार असून, यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे ठरवले. पत्रकारी क्षेत्रातील आव्हाने, स्थानिक समस्यांचे निराकरण आणि पत्रकारांचे हक्क यावरही सविस्तर चर्चा झाली. संघटनेला अधिक गतिमान आणि प्रभावी बनवण्यासाठी नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून ठोस पावले उचलण्याचे नियोजन करण्यात आले.

अध्यक्ष भानुदास भारंबे यांनी सांगितले शोधक पत्रकारिता करणे आणि निर्भिड पत्रकारिता करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.

या बैठकीला वरील सर्व मान्यवर उपस्थित होते. नवनिर्वाचित कार्यकारिणीने पत्रकार संघाला अधिक सक्षम करून समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. येत्या काळात पत्रकारीय आणि सामाजिक प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी संघटना कटिबद्ध आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!