भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

निवडणूक आयोगाला कोर्टाची नोटीस, अखेरच्या टप्प्यात मतदान कसं वाढलं, व्हिडिओ द्या

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यात विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप सातत्याने महायुतीवर केला जात आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून आजही संशय व्यक्त केला जात असताना निवडणुकीत वाढलेल्या मतदानावरून आयोगाकडून अजूनही खुलासा झालेला नाही. अशातच वंचित आघाडीचे सर्वेसर्वा आणि ऍड प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केली होती. या याचिकेची दखल हायकोर्टाने घेतली आहे. आज या याचिकेवर सुनावणी पार पडली. या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाकडून केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाला नोटीस बजावण्यात आली असून २ आठवड्यात खुलासा सादर करावा असे निर्देश कोर्टाने त्यांना दिले आहेत.न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी करण्यात आली.

याचिकेत राज्यात विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ६.०० नंतर झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवर विरोधी पक्षांनी आक्षेप नोंदवला आहे. याचिका कर्त्यांच्या वतीने ऍड. प्रकाश आंबेडकरांनी बाजू मांडली. त्यांनी कोर्टात ईव्हीएमबद्दलच्या याचिकेवर युक्तीवाद केला.

संध्याकाळी ६ नंतर रिटर्निंग आफिसर यांनी नियमांचे योग्यरित्या पालन केले नाही, असा आरोप करत निवडणूक आयोगाने सायंकाळी ६ नंतर झालेल्या मतदानाचे व्हिडीओ द्यावे, अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली. संध्याकाळी ६ वाजे नंतर झालेल्या ७६ लाख मतदानावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. यावर प्रकाश आंबेडकरांनी संध्याकाळी ६ नंतर निवडणूक विभागाने व्हिडीओग्राफी केली का? असा सवालही केला.

निवडणूक आयोग निवडणुका पारदर्शीकपणे पार पाडल्याचा दावा करत असेल, तर तोच त्यांनी कोर्टासमोर करावा आणि त्यांच्याकडे किती स्लीप्स वाटल्या आणि किती वाटल्या नाहीत त्याची माहिती कोर्टासमोर द्यावी, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. निवडणुकीचा निकाल जाहीर करताना पोल वोट्स आणि काउंटर वोट्स यांची जुळवणी झाली पाहिजे. यांची जुळवणी झाली नसेल, तर मग रिटर्निंक ऑफिसरने तो सगळा दस्तऐवज निवडणूक आयोगाकडे पाठवला पाहिजे. त्यानंतर निवडणूक आयोग जे सांगेल, त्यानुसार तो निकाल दिला पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!