भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार, परिसरात दहशत

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | भुसावळ तालुक्यातील शिंदी येथील नागमई शेती शिवारात अचानक गायीवर हल्ला केला त्यात गाय ठार झाली.

भुसावळ तालुक्यातील शिंदी येथील नागमई शेती शिवारात
मारोती मधुकर पाटील यांच्या गायीवर बिबट्याने हल्ला केला त्यात गाय ठार झाली. घटनास्थळी बिबट्याचे ठसेही आढळले आहेत.

घटनास्थळाचा वनविभागाने पंचनामा केला आहे. वनपाल अनिल साळुंखे व वनकर्मी सुनील पाटील उपस्थित होते. या घटनेने शेतकरी आणि शेतमजूर वर्गात घबराट पसरली असून बिबट्याच्या भीतीमुळे शेतकरी व मजूर शेतात काम करण्यासाठी जाण्याची हिंमत करीत नसल्याने शेतीच्या कामावर परिणाम होऊ लागला आहे. वनविभागाने बिबट्याच्या बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर शेतकऱ्यांनी सावधगिरीने वावरावे, असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!