भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

बापाने केला व्यसनाधीन पोटच्या मुलांचा खून

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव (प्रतिनिधी)। शहरातील बाळाजीपेठ मध्ये राहणाऱ्या 26 वर्षीय तरुणाच्या बापाने मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु आहे.

शहरातील सौरभ सुभाष वर्मा (वय 26) राहणार बालाजी पेठ याला दारूचे व्यसन होते, दररोज दारू पिऊन घरात वाद घालत होता. अशाच पद्धतीने 12 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास दारू पिऊन सौरभ घरी आला. दारू पिऊन घरी आल्यानंतर वडील संतोष बन्सीलाल वर्मा यांचे सौरभला बोलचाल होऊन यातच दोघांमध्ये वाद निर्माण झाला. सौरभने हातातील चाकु काढून वडिलांना धमकावत होता. त्यामुळे वडिलांनी सौरभच्या हातातील चाकु हिसकावून त्याला दम दिला. यातच सौरभ हा वडिलांच्या अंगावर जोरात धावून आला असता वडिलांच्या हातातील चाकु सरळ सौरभच्या पोटात खुपसला गेला. त्यात तो गंभीर जखमी झाला. तातडीने सौरभला जिल्हा रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक जाधव यांनी मयत घोषित केले घटना घडल्यानंतर संशयित आरोपी सुभाष बन्सीलाल वर्मा हे शनिपेठ पोलिस ठाण्यातस्थानकात हजर झाले. दरम्यान, या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!