भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

धार्मिकरावेर

श्रावण सोमवार निमित्त रोषणाईने उजळले दसनूरचे सुमारे आठशे वर्षांपूर्वीचे उमेश्वर महादेव मंदिर

दसनुर/सिंगनूर. ता. रावेर.मंडे टु मंडे न्युज | रावेर तालुक्यातील दसनूर येथील सुकी नदीकाठावर प्राचीन स्वयंभू उमेश्वर महादेवाचे मंदीर आहे.श्रावण सोमवार निमित्त या मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.श्रावण महिन्या निमित्त मंदिरात फुलांची आरास विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.सकाळपासून मंदिरात दर्शनासाठी गर्दी होते.यामुळे गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.

सुमारे आठशे वर्षापूर्वीची परंपरा असलेले हे प्राचीन मंदिर असून त्यास क वर्ग तिर्थक्षेत्राची मान्यता आहे. भक्तांसाठी भक्तनिवासाची उभारणी करण्यात आली आहे.या मंदिरा बाबत पुरातन अख्यायिका ही सांगितली जाते.

दशरथ राजा शृंगधाम यांनी सिंगत येथील श्रृंगऋषींना श्रीराम जन्मोत्सवासाठी अयोध्येला येऊन पुत्र कामेष्टीला यज्ञ करण्याची विनंती केली होती.त्यांनी दसनूर गावात मुक्काम केल्याची आख्यायिका आहे मनोभावे त्यांनी उमा महेश्वरा ची आराधना केली.पूर्वी त्या ठिकाणी उकिरडा होता. एका भक्ताला तेथे साक्षात्कार झाल्याचे समजते.ती जागा साफ करीत असतां ना त्यातून स्वयंभू पिंड निघाली. पिंडीला फावडे लागले व पाणी आणि रक्ताच्या धारा निघाल्या होत्या.तसेच ही पिंड येथून खोदून गावात स्थापित करण्यासाठी आणण्याचा प्रयत्न केला. पिंड खोदली असता जमिनीखाली पाणी लागले .पण पिंडी चा अंत नाही.ही पिंड जमिनीतून निघाली आहे.तसेच ही पिंड जमिनीत थोड्या अंतराने अष्टकोनी आहे.त्याच ठिकाणी नंतर मंदिराची उभारणी झाली.

हे प्राचीन मंदिर अष्टकोनी आकारात बांधले आहे.तसेच पूर्वी हे मंदिर मातीचे व दगडांचे होते.आज त्याला बाह्यरूप नवीन दिले असून २०० वर्षापासून सकाळ,संध्याकाळ महादेवाची नित्य नियमाने आरती व पूजापाठ होते. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी येथे फराळ, प्रसाद वाटपाचा व तिसऱ्या म्हणजे ३१ ऑगस्ट रोजी श्रावण सोमवारी भजन, अभंग, गवळणी ,गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील भजनी मंडळींनी या कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आहावाहन भजनी मंडळ यांनी केले आहे.

महाशिवरात्रीला महादेवां च्या मुकूटाची मोठी दिंडी गावातून फिरत असते.कार्तिक महिन्यात पहाटे कार्तिक स्नान,गावातून काकडा आरती व दिंडी काढली जाते . कार्यक्रम यशस्वीतेसाठी उमेश्वर महादेव संस्थानचे सर्व संचालक, सदस्य व भजनी मंडळी व ग्रामस्थ परिश्रम घेत असतात.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!