सुनांना द्यावा लागणार माहेरचा दाखला ; अन्यथा मतदार यादीतून नाव कमी होणार
कुंभारखेडा ता.रावेर मंडे टू मंडे न्यूज (प्रा.योगेश कोष्टी) – एस आर आय कार्यक्रमांतर्गत २०२४ च्या मतदार यादीचे २००२ शी मॅपिंग सुरू झाल्या असून आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात मतदारांचे २५% मॅपिंगचे काम पूर्ण झाले आहे.
२००२ या सालातील पुरावे जर आपल्याकडे नसतील तर आपला मतदानाचा हक्क हिरावला जाऊ शकतो या कारणास्तव जे पुरावे देऊ शकणार नाही अशा सुनांना आपल्या माहेरकडचे पुरावे देण्याची वेळ आलेले आहे आणि त्यामुळे माहेराकडून आई-वडील किंवा आजी आजोबांच्या नोंदी सक्तीने शोधण्यात येत आहे.
किंबहुना याच कारणास्तव परिसरातील सासुरवासिनी माहेराला फोन लावून नोंदी मागवण्यात व्यस्त असल्याच्या दिसून येत आहे. योग्य असे पुरावे सादर न झाल्यास मतदार यादीतून नाव कमी होईल असा शासनादेश असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची तारांबळ उडत आहे.
शासनाने २००२ ची यादी पाहण्यासाठी क्यू आर कोड प्रसिद्ध केला असून यात बीएलओ कोण आहे आणि त्यांची यादी आणि मोबाईल क्रमांक सुद्धा दिला आहे.
