तब्बल ३० वर्षानंतर मित्र मैत्रिणी आल्या एकत्र
बलवाडी. ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज. आशीष चौधरी |
रावेर तालुक्यातील तांदलवाड़ी येथील माध्यमिक शिक्षण प्रसारक मंडळाने चालविलेल्या माध्यमिक विद्यालय व ज्यू कॉलेज मध्ये एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल तीस वर्षानंतर जुने मित्र व मैत्रिणी एकत्र आल्या होत्या.
सन ९६-९७ च्या दहावी वर्गाच्या दोन्ही तुकड्यांच्या जवळपास ४५ मुले व मुली एकत्र येत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत नवीन आठवणी सोबत घेऊन गेले. तांदलवाडी गावातील माध्यमिक विद्यालयात दि. २९ मार्च रविवारी सकाळी हा कार्यक्रम आयोजित केला होता यात तीस वर्षांपूर्वी चे ९६-९७ वर्षीचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व्यासपीठावर उपस्थित होते.तसेच सध्याचे शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी सुध्दा हजर होते आज व्यवसायासाठी, नोकरीसाठी बाहेरगावी पुणे,मुंबई,इंदोर आदी ठिकाणी गेलेले मित्र मैत्रिणी ह्या निमित्ताने सहपरिवार एकत्र आले होते. कार्यक्रम मान्यवरांचे स्वागत, सरस्वती पूजन,दीप प्रज्वलन, विद्यार्थ्यांचा परिचय,मनोगत,शिक्षकांचे भाषण,आभार,स्नेह भोजन आदी प्रकारे उत्साहात पार पडला.
माजी मुख्याध्यापक आर एम पाटील, बी एस चौधरी, एस आर पाटील,ए आर चौधरी, शिक्षक भोपळे सर,एच ए चौधरी, शिक्षिका के ए तायडे(लोखंडे मॅडम),शिक्षकेतर कर्मचारी डी जे महाजन, प्रभाकर महाजन,श्रीराम पाटील,सावळे, आदी उपस्थित होते.सर्व दहावी बॅचच्या मुले आणि मुलींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहभाग घेतला. सूत्र संचालन उदय पाटील यांनी तर आभार प्रवीण भोई यांनी केले.
