राज्यातील अनाधिकृत शाळा बंद कराव्यात अन्यथा …..
पुणे, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यातील अनाधिकृत शाळा येत्या शैक्षणिक वर्षात बंद कराव्यात असे पत्रक काढून अशा सूचना शिक्षण संचालनालया कडून देण्यात आल्या आहेत. या पत्रकात अशा शाळांना मोठ्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.परंतु सूचना देऊनही शाळा बंद न केल्यास प्रतिदिन दहा हजार रुपये दंड करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच अनधिकृत शाळांच्या व्यवस्थापनास एक लाख रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. दरवर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी अनाधिकृत शाळांची दिलेल्या निर्देशांनुसार योग्य ती कारवाई होणं अपेक्षित आहे, असंही या पत्रकातून निर्देश देताना म्हटलं.
अनधिकृत शाळा सुरू राहिल्यास शिक्षणाधिकाऱ्यांवरच शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व शाळांच्या फलकावरती ‘यू डायस’ नंबर असणं आवश्यक आहे.