मुक्ताईनगरराजकीय

शरद पवार आणि पक्षाच्या नेत्यांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही— रोहिणी खडसे

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधि | एकनाथराव खडसे यांनी पक्षांतराचा निर्णय घेतल्यावर मला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात राहण्यासाठी परवानगी दिली त्याबद्दल शरद पवार आणि पक्षाच्या नेत्यांचे मी आभार व्यक्त करते आणि शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याला तडा जाऊ देणार नाही असे प्रतिपादन रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर येथे आयोजित प्रचार सभेत केले

रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटिल यांच्या प्रचारार्थ मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रचार सभा पार पडली यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटिल विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांची प्रमुख उपस्थिती होती

यावेळी रोहिणी खडसे पुढे म्हणाल्या आज सभे निमित्त शरद पवार हे मुक्ताईनगर येथे आलेत यापूर्वी साडेचार वर्षा आधी त्यांची इथे माझ्या विरोधात सभा झाली होती त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे मी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला त्यांनतर आता एकनाथराव खडसे यांचा पक्षांतराचा जो निर्णय झाला त्या निर्णयानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात राहण्याचा निर्णय घेतला हा निर्णय घेतल्या नंतर मी शरद पवार यांना भेटले व सांगितले साहेब नाथाभाऊ यांच्या पक्षांतरच्या निर्णयानंतर मला आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात थांबायचे आहे पण आपला आदेश, आपली सूचना आणि आपण सांगत असाल तर माझी आपल्या पक्षात थांबायची इच्छा आहे कारण मला आपल्या पक्षाची विचारधारा आणि आपले नेतृत्व आवडते आमच्या वाईट काळात आपण जि साथ आम्हाला दिली ती मी आयुष्यभर विसरू शकणार नाही म्हणून मला आपल्या पक्षातच राहायचे आहे आणि माझी आपल्याला विनंती आहे आपण मला सांभाळून घ्यावे. सुप्रियाताई यांना आपण जे प्रेम देता तसे प्रेम मला द्यावे, व मला कन्येप्रमाणे सांभाळून घ्यावे अशी शरद पवार यांना विनंती केली आणि शरद पवार यांच्या आदेशाप्रमाणे मि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात राहण्याचा हा निर्णय घेतला आहे.

शरद पवार यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते प्रांताध्यक्ष जयंत पाटिल , सुप्रिया सुळे आणि पक्षाच्या सर्व नेत्यांचे आभार व्यक्त करते. पक्षाने आणि सर्व नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही
मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निष्ठेने काम करणार आणि भविष्यात देखिल याच पक्षात राहून काम करत राहिल ,नेतेगणांनी मला एकटे पडू दिले नाही आणि प्रत्येक वेळेस मला साथ देत आहेत. त्याबद्दल नेते गणांना धन्यवाद देते असे रोहिणी खडसे म्हणाल्या

पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटिल यांच्या साठी माझ्या प्रत्येक बुथ वरचा कार्यकर्ता हा जोमाने काम करत असुन प्रत्येक बुथ वर श्रीराम पाटील यांना मताधिक्य मिळवून देईल
हे निकालातून दिसेलच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराला मुक्ताईनगर मधुन लिड मिळवून देण्याच काम या सर्वांच्या मदतीने करेल हा मि शब्द देते
तसेच या मतदारसंघामध्ये जर श्रीराम पाटील यांना कमी लीड मिळाली तर त्याला मि जबाबदार असेल आणि जर जास्त लिड मिळाली तर त्याला हि मायबाप जनता जबाबदार राहील सगळे श्रेय या जनतेला जाईल असे प्रतिपादन रोहिणी खडसे यांनी केले

मुक्ताईनगर विधानसभा आणि हा परिसर शरद पवार यांच्यावर खुप प्रेम करतो वर्षानुवर्षे या लोकांनी शरद पवार यांच्यावर प्रेम केले आहे तसेच हे या मतदारसंघातील लोक खंबीरपणे माझ्या पाठिशी उभे आहेत,मला साथ देत आहेत, कोणी माझ्या भावा सारखे साथ देत आहेत, कोणी माझ्या वडिलांसारखे साथ देत आहेत कोणी माझ्या आई सारखे मला सांभाळून घेत असल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले. मुक्ताईनगर मतदारसंघातील मुक्ताईनगर बोदवड, रावेर या तिन्ही तालुक्यांची भौगोलिक परिस्थिती , प्रश्न समस्या वेगळ्या आहेत त्या भविष्यात शरद पवार यांच्या माध्यमातून सुटतील असा रोहिणी खडसे यांनी विश्वास व्यक्त केला 2004 साली कृषी मंत्री पदाची धुरा शरद पवार यांनी हातात घेतली त्यावेळी भारत देशासमोर धान्य आयात करण्याची वेळ होती परंतु शरद पवार यांच्या निर्णयांमुळे अन्नधान्य उत्पादन वाढले व धान्य आयात करणारा भारत देश धान्य निर्यातदार देश बनला तसेच शरद पवार यांनी शेतकऱ्यांना सर्वात मोठी कर्जमाफी दिली शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले याबद्दल शरद पवार यांचा अभिमान असल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले.

शरद पवार यांच्या दूरदृष्टीने घेतलेल्या निर्णयांमुळे जनतेचे हित साध्य झाले म्हणूनच नेते पक्षाला सोडून गेले तरी सामान्य जनता पक्षाच्या सोबत असल्याचे रोहिणी खडसे म्हणाल्या बोदवड आणि मुक्ताईनगर तालुक्यातील व जिल्हयातील अनिष्ट तफावती मध्ये असणाऱ्या वि. का सोसायटीच्या सभासद शेतकऱ्यांना बँकेच्या निर्णयामुळे पिक कर्ज मिळत नाही आहे त्यासाठी शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्या चकरा माराव्या लागत आहेत तरी कर्ज मिळत नाही हा प्रश्न सोडवावा लागेल त्यासाठी सर्वांना प्रयत्न करावे लागतील अशी व्यासपीठावरील नेत्यांना रोहिणी खडसे यांनी विनंती केली सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे देशा समोर महागाई बेरोजगारी अशा समस्या निर्माण झाल्या आहेत त्यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली असुन
शरद पवार यांनी हे चित्र बदलवण्याचे ठरवले असुन बदलाला सुरुवात झाली आहे इथे तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित आहात हे बदलाचे द्योतक असल्याचे रोहिणी खडसे म्हणाल्या

तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हां समोरील बटण दाबुन जास्तीत जास्त मताधिक्याने उमेदवार श्रीराम पाटिल यांना निवडून देण्याचे रोहिणी खडसे यांनी उपस्थितांना आवाहन केले यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, सतिष अण्णा पाटिल, आ शिरीष चौधरी, आ.राजेश एकडे, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटिल,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार, उमेदवार श्रीराम पाटिल, जिल्हा निरीक्षक प्रसेन्नजित पाटील,राजा राजापुरकर, संतोष रायपुरे, माजी आमदार अरुण पाटिल, संतोष चौधरी, कैलास पाटिल, दिलीप सोनवणे,भिम आर्मीचे अध्यक्ष जगन सोनवणे,वंदना चौधरी, प्रतिभा शिंदे, विनोद तराळ, डॉ जगदीश पाटील, डॉ अरविंद कोलते, ईश्वर रहाणे,निवृत्ती पाटिल,सोपान पाटील,यु डी पाटिल, एजाज मलिक,आबा पाटील ,किशोर पाटिल,दिनेश पाटिल,पवन पाटिल,दिपक पाटिल,अजय बढे, विकास पाटिल,संजय पाटिल, डॉ बि सी महाजन यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना(उ बा ठा) संयुक्त महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!