भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

कैदी महिले कडे मुलीला ‘शरीरसुखासाठी’ पाठवण्याची मागणी ; एएसआय निलंबित !

पोलिस दलाची प्रतिमा मलिन करणारी संतापजनक घटना!

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ म्हणजेच सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. मात्र अकोल्यात एका पोलीस उपनिरीक्षकाने (ASI) या ब्रीदवाक्याला हरताळ फासल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये असलेल्या एका आरोपी महिलेला तुझ्या मुलीला आणून दे, अशी मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तुझ्या मुलीला १० हजार रुपये देतो, तिला एक रात्र माझ्याकडे पाठव, अशी मागणी केल्याचा खळबळजनक आरोप या पोलीस कर्मचाऱ्यावर झाला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला असून पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

तत्पर पोलिस अधिकाऱ्यांची तडकाफडकी कारवाई
या घटने संदर्भात माहिती मिळताच आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख पीआय अनिल जुमळे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पीडित महिलेने हंबरडा फोडत घडलेला सर्व प्रकार जुमळे यांना सांगितला.

संतापलेल्या PI अनिल जुमळे यांनी संबंधित ASI राजेश जाधव याला जाब विचारला. त्यानंतर रागाच्या भरात त्याच्या कानशिलात मारण्यासाठी हात उगारला. मात्र, समोरचा कर्मचारी पोलीस वर्दीत असल्याने त्यांनी स्वतःला सावरले. वर्दी घातली आहेस ना तू, असं कृत्य करताना लाज कशी वाटली नाही? अशा शब्दांत त्याला फटकारले.

व्हिडीओमधील धक्कादायक संभाषण
पीडित महिला: साहेब, याने मला विचारलं तुझ्या मुलीचं वय किती आहे? मी म्हटलं २७ वर्ष आहे. तर हा म्हणतो, अशा वयाच्या मुली छान असतात… १० हजार रुपये देतो, तिला माझ्याकडे पाठव.
ASI राजेश जाधव: मी असं एक शब्द तरी बोललो का? सांग यांना…
पीआय अनिल जुमळे: थांबा हो… आवाज नाही. तिला बोलू द्या काय म्हणतेय ते.
उपस्थित महिला पोलीस कर्मचारी: माझ्यासमोर तर हे काही बोलले नाहीत, पण नंतर बोलले असतील तर मला माहिती नाही.
पीडित महिला: हाच बोलला साहेब! १० हजार देतो, एक रात्रीसाठी तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव… साहेब, गुन्हा मी केलाय, माझ्या मुलीने नाही केला. मग तिच्याबद्दल असा शब्द हा कसा काय वापरू शकतो?
पीआय अनिल जुमळे : (संतापून ASI ला) “असं कृत्य करताना तुला लाज कशी वाटली नाही? वर्दी घातली आहेस ना तू!”
(यानंतर पीआय जुमळे यांनी फोनवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेली माहिती):
पीआय अनिल जुमळे: “जय हिंद सर, मी पीआय जुमळे बोलतोय. सायबरची एक महिला आरोपी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये आहे. या ठिकाणी गार्डवर असलेला ASI राजेश जाधव तिला विचारतोय की तुझ्या मुलीचं वय काय? आणि पुढे म्हणतोय की, १० हजार रुपये देतो, मुलीला रात्रभर माझ्याकडे पाठव. सर, हा राजेश जाधव आहे, सिव्हिल लाईनचा.”

नेमकी काय आहे घटना?
अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये काल सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. ८० लाखांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या एका आरोपी महिलेला एका लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. यावेळी तिथे सुरक्षेसाठी तैनात असलेला ASI राजेश जाधव याने या महिलेकडे तिच्या मुलीच्या वयाची चौकशी केली. यानंतर त्याने तुझ्या मुलीला १० हजार रुपये देतो, तिला एक रात्र माझ्याकडे पाठव अशी अश्लील मागणी केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

निलंबनाची कारवाई
या धक्कादायक प्रकारामुळे अकोला पोलिसांची प्रतिमा डागळली  गेली आहे. पोलीस ठाण्यातच महिला सुरक्षित नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. या प्रकरणाची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेत ASI राजेश जाधव
या अधिकाऱ्याला निलंबित करत त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जनसामान्यांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सलाम या कर्तव्य तत्पर पोलिस अधिकाऱ्याला
सदरच्या घडलेल्या पोलिसा च्या घृणास्पद कृत्यामुळे पोलिस खात्याची प्रतिमा डागळली असली तरी वरिष्ठ कर्तव्य तत्पर अधिकाऱ्यांनी केलेल्या तत्काळ व योग्य कारवाईमुळे अशा पोलिस अधिकाऱ्यांनी पोलीस खात्याची प्रतिमा नक्कीच उंचावेल… आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई कौतुकास्पदच ठरणार.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!