२ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे लोकशाही दिन
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन २ फेब्रुवारी २०२६ सोमवार रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी दिली.
नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज केलेला असेल आणि सदरहू अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरुन कोणतेही उत्तर मिळालेले नसेल अशाच वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेऊन या लोकशाही दिनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे

