निंभोरा येथील युवकाचा विहिरीत पडून मृत्यू
निंभोरा बु: ता: रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | दि. २८ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास वाघोदा ते निंभोरा रोडवरील दसनूर फाट्यावर मयत दीपक विलास चौधरी (पाटील) वय १९ रा. निंभोरा बु: हा आपल्या मित्रांसोबत चार चाकी वाहन डस्टर गाडी क्रमांक MH 13 BN. 9091 या गाडीने सावदा येथून जेवण करून येताना गाडीवरील चालक संस्कार प्रकाश चौधरी राहणार निंभोरा बु: यांच्या ताब्यातील गाडी पलटी होऊन अपघात झाला व या गाडीतील मयत दीपक विलास चौधरी बाहेर निघताना रोड लगत शेतातील विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला तसेच गाडी चालक संस्कार चौधरी सोबत असलेले मित्र कुणाल शरद बारबंद,शुभम दत्तू दोडके, नितीन अरुण चौधरी, गणेश अशोक कुंभार, यांना देखील किरकोळ दुखापत झाली त्याचबरोबर गाडीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे कळते.
याबाबतची खबर निंभोरा पोलीस ठाण्यात नथू रामभाऊ चौधरी (पाटील) यांनी दिल्याने निंभोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास स. पो . नि.मीरा देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उप निरीक्षक ममता तडवी हे.का अविनाश पाटील, योगेश चौधरी, किरण जाधव परेश सोनवणे महेंद्र महाजन व पोलीस अधिक तपास करत आहे. युवकाचा मृत्यू झाल्याने निंभोरासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
