भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

डिपॉझिट जप्त म्हणजे काय? जिल्ह्यातील ४२४ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त, सर्वाधिक भुसावळ चे उमेदवार

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | नुकत्याच राज्यात नगरपालिका, व नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. त्यात जळगाव जिल्ह्यात १८ पालिकांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये निवडणुकीत नगराध्यक्ष व सदस्यपदाच्या तब्बल ४२४ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. त्यात भुसावळ, चाळीसगाव, अमळनेर मधील सर्वाधिक उमेदवारांची अनामत रक्कम गेली आहे.

लोकसभा निवडणुका,  विधानसभा निवडणुका किंवा नगरपालिका निवडणुका असोत प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे ठराविक रक्कम जमा करावी लागते. या रकमेला ‘अनामत रक्कम’ किंवा सिक्युरिटी डिपॉझिट असं म्हणतात.

निवडणुकीत एकूण वैध मतांच्या एक षष्ठांशापेक्षा कमी मते मिळाल्यास संबंधित उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होते.

निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, कोणत्याही निवडणुकीत उमेदवाराला एकूण वैध मतांपैकी १/६ म्हणजेच १६.६७ टक्के मते मिळाली नाहीत, तर त्याचे डिपॉझिट जप्त केलं जातं. एखाद्या उमेदवाराला १६.६७  टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाल्यास त्याचं डिपॉझिट त्याला परत केलं जातं. एखाद्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतल्यास किंवा कोणत्याही कारणास्तव त्याची उमेदवारी रद्द झाल्यास, त्याने जमा केलेलं डिपॉझिट परत दिलं जातं. याशिवाय विजयी उमेदवारांनासुद्धा डिपॉझिट परत मिळतं.

आवश्यक मतांची टक्केवारी न गाठल्याने संबंधित उमेदवारांचे डिपॉझिट जप्त केले जाते. मतमोजणीनंतर प्रशासनाने मतांची आवश्यक टक्केवारी न गाठणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील नगराध्यक्ष व सदस्यपदासाठी उमेदवारी करणाऱ्या तब्बल ४२४ उमेदवारांची डिपॉझिट जप्त केली आहे. या उमेदवारांची ४ लाख ८५ हजारांबर अनामत रक्कम शासनाकडे जमा झाली आहे.

भुसावळच्या सर्वाधिक उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. भुसावळ मधील ८५ उमेदवारांची त्याखालोखाल चाळीसगाव ४० व अमळनेर ३२ उमेदवारांची डिपॉझिट जप्त करण्यात आली आहे.
चोपड्यात नगराध्यक्षपदाच्या दोन तर सदस्यपदासाठीच्या २३ अशा २५ उमेदवारांची अनामत रकम जप्त झाली आहे.

जिल्ह्यातील नगरपालिका निहाय यांची झाली अनामत रक्कम जप्त

भुसावळ.   ८५
चाळीसगाव ४०
रावेर.        ३७
अमळनेर. ३२
नशिराबाद २७
चोपडा.    २५
वरणगाव. २५
फैजपूर.  २५
पाचोरा.   २१
यावल.   १९
एरंडोल  १६
सावदा   १५
मुक्ताईनगर १५
जामनेर  १४
धरणगाव ११
शेंदुर्णी.   १०
पारोळा   ६
भडगाव   १

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!