एक हजाराची लाच घेताना आदर्श विद्यालयाचा मुख्याध्यापक एसीबी च्या जाळ्यात
धुळे,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l शाळेत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमा निमित्त खर्चापोटी रुपये एक हजाराची लाच घेताना आदर्श विद्यालयाचा मुख्याध्यापकाला धुळे एसीबी ने रंगेहाथ पकडुन अटक केली. सदरची घटना ही आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली असून त्या मुख्याध्यापकांचे नाव प्रदीप पुंडलिक परदेशी वय ५५ वर्ष, रा.कुसुंबा, ता.धुळे असे आहे.
तक्रारदार महिला या सोशल ऍण्ड कल्चरल असोशिअशन कुसुंबा, ता.जि. धुळे संचलित आदर्श हायस्कूल मध्ये तक्रारदार महिला शिक्षिका म्हणून कार्यरत असून शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप परदेशी यांनी शाळेतील सर्व कार्यरत असलेल्या शिक्षकांकडून शाळेत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमापोटी एक हजार व कर्मचाऱ्यांकडून आठसे रुपये अशी मागणी केली असता तक्रारदार शिक्षिकेने यास विरोध केल्याने त्यांना हजेरी पुस्तिकेवर स्वाक्षरी करण्यास प्रतिबंध करण्यात आला.
तक्रारदार महिला शिक्षिका हिने या बाबत धुळे एसीबी कडे तक्रार दाखल केल्याने आज मंगळवार दि .१९ रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मुख्याध्यापक प्रदीप परदेशी याना त्यांच्याच दालनात रुपये एक हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडुन अटक करण्यात आली.या बाबत धुळे तालुका पोलीसस्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई धुळे लाचलुचपत विभागाचे पोलिस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पो.निरिक्षक हेमंत बेंडाले, मंतिजसिंग चव्हाण, रुपाली खांडवी,राजन कदम,मकरंद पाटील,बागुल आदींनी केली.