भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावप्रशासन

” राष्ट्रीय मतदार दिन “२४ जानेवारी २०२५ रोजी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकशाही परंपरांचे जतन करण्यासाठी निःपक्षपाती व शांततापूर्ण निवडणुकांचे पावित्र्य राखण्यासाठी दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी सर्व मतदारांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ दिली जाते. त्या नुसार संपूर्ण जिल्हाभरात मतदान केंद्र, विधानसभा मतदार संघ व जिल्हास्तरावर १५ वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येत आहे. यावेळी राष्ट्रीय मतदार दिवसाचा विषय ‘नथिंग लाइक व्होटिंग, आय व्होट फॉर शुअर’ असा आहे.

राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून २५ जानेवारी रोजी सर्व मतदारांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ दिली जाते. तथापि. दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी शनिवार सुटटीचा दिवस असल्यामुळे दिनांक २४ जानेवारी २०२५ रोजी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्यात यावी.

त्याअनुषंगाने, आपल्या अधिपत्त्याखालील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सर्व अधिकारी/ कर्मचारी यांच्यासाठी शपथ घेण्याचा कार्यक्रम दि.२४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आयोजीत करण्यात यावा व या बाबतचा अहवाल फोटोसह जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव निवडणूक शाखेत येथे पाठवावा अशा सुचना जळगाव जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!