अश्लील व्हिडिओ व्हायलर करण्याची धमकी देत डॉक्टर कडे २ कोटी खंडणीची मागणी
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | धनाढ्य डॉक्टरला अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत २ कोटीं रुपयांची खंडणी मागण्यात आली.एका अज्ञात व्यक्तीने या डॉक्टरला एक निनावी चिठ्ठी पाठवून त्याचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातील असून या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
डॉक्टरला अज्ञात व्यक्तीने एक निनावी चिठ्ठी पाठवून त्याचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली आहे. तसेच व्हिडिओ क्लिप व फोटो व्हायरल न करण्यासाठी दोन कोटी रुपयांची खंडणीही मागितली आहे.
या संदर्भात संबंधित डॉक्टरने पाचोरा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध खंडणी, धमकी आणि बदनामी संबंधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी निनावी चिठ्ठ्या जप्त केल्या असून, फॉरेन्सिक तपासाद्वारे हस्ताक्षर व इतर पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
हा डॉक्टर कोण? काय आहे प्रकरण?
ज्या डॉक्टरला दोन कोटी एवढ्या मोठ्या रक्कमेची खंडणी मागितली तो डॉक्टर कोण? तो डॉक्टर नक्कीच धनाढ्य असावा, आणि महत्त्वाचे म्हणजे त्या व्हिडिओ व फोटो मध्ये नक्की काय आहे ? हे प्रकरण नक्की आहे काय? या बाबत पाचोरा शहर व परिसरात चर्चेला उधाण आले असून या बाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.
दरम्यान, याच प्रकरणात डॉक्टरच्या एका सहकाऱ्याच्या मोबाईलवर “या प्रकरणात हस्तक्षेप करू नको” असा मेसेज प्राप्त झाला आहे. या मेसेजचा स्त्रोत शोधण्यासाठी पोलिसांकडून मोबाईल ट्रेसिंग, लोकेशन ट्रॅकिंग सुरू करण्यात आले आहे.अश्लील व्हिडिओ क्लिप व फोटो व्हायलार करण्याची धमकी देत ही ब्लॅकमेल करून दोन कोटींची खंडणी मागणारी अज्ञात व्यक्ती कोण? पोलिस पुढील तपास करीत असून अज्ञात आरोपीचा चेहरा लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

