भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

लाच प्रकरणात अटक केलेल्या महिला अधिकाऱ्याला पोलिस कस्टडी

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्हा परिषदेच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागातील जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती माधुरी सुनिल भागवत (वय ३८) यांना ५,००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिनाक २४ जुलै रोजी रंगेहाथ पकडले होते.या संदर्भात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा दिव्यांग विभाग, जिल्हा परीषद कार्यालय, जळगांव श्रीमती माधुरी भागवत, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांनी तक्रारदार यांचे जुन, २०२५ पगार बीलामध्ये काहीही त्रुटी न काढता पगार बीलाबर सहया करून ते पुढे जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्याकडे पाठवण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे १२,०००/- रू. लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी दिनांक २२/०७/२०२५ रोजी ला.प्र.वि. जळगाव यांचेकडे लेखी तक्रार दिली होती.

श्रीमती माधुरी भागवत यांनी १०,०००/- रु. लाचेची मागणी करून, तडजोडीअती प्रथम हफ्ता म्हणून ५,०००/- रू.व उर्वरित ५,००० रुपये रक्कम इतर बिले निघाल्यावर दया, या प्रमाणे २४/०७/२०२५ रोजी श्रीमती माधुरी भागवत यांनी तक्रारदार यांचेकडून ५,०००/- रू लाचेची रक्कम स्वतः पंचासमक्ष स्वीकारली होती त्या संदर्भात त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांचेवर जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या संदर्भात श्रीमती माधुरी सुनिल भागवत, वय ३८ वर्षे, धंदा नोकरी, (जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी), रा. पिंप्राळा, जळगाव.(मूळ पद वर्ग -०३ प्रभारी कार्यभार वर्ग- ०२) याना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने ०१ दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. असे पोलिस निरीक्षक हेमंत नगरे ला.प्र.वि. जळगाव यांनी कळविले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!