जामनेर

कबूतर पकडण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा विहीरीत बुडून मृत्यू

जामनेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l कबूतर पकडण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा विहीरीत पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार रोजी संध्याकाळी जामनेर तालुक्यातील तळेगाव येथे घडली.

अनिकेत जितेंद्र जोहरे. वय १३. आणि अभय भागवत कोळी.वय १७, ही दोन्ही मुले शुक्रवारी सकाळी दोर घेऊन घराबाहेर पडली. रस्त्यात भेटलेल्या मित्रांनादेखील त्यांनी सोबत येण्याचा आग्रह धरला. मात्र त्यांनी नकार दिल्याने हे दोघे जण जंगलाकडे निघाले. सायंकाळपर्यंत मुले घरी परत न आल्याने त्यांच्या पालकांनी शोध घेण्यास सुरुवात केली.काही मुलांनी अनिकेत व अभय ज्या मार्गाने गेले त्याची माहिती दिली. त्याप्रमाणे ग्रामस्थांनी शोध घेतला. त्यावेळी एका विहीरीत दोघांचे मृतदेह आढळून आले.

रात्रीच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. शनिवारी सकाळी दोघांचे मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. जामनेर पोलिस स्टेशनला या बाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनिकेत जोहरे याच्या पश्चात आई, वडील, २ भाऊ असा परिवार आहे. तर अभयला त्याची आजी सांभाळत होती. त्याला तीन विवाहित बहिणी आहेत. दोन्ही परिवार मोलमजुरी करून गुजराण करीत होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!