क्राईमराष्ट्रीय

संतापजनक ! गाईवर ॲसिड हल्ला, गाय गंभीर जखमी

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l एक अतिशय संतापजनक प्रकार समोर आला आहे. गाईवर ॲसिड हल्ला करण्यात आल्याचा अतिशय संतापनजक प्रकार उघडकी आलाय. मुक्या जनावरावर झालेल्या या हल्ल्यामुळे मोठी खळबळ उडाली असून संतापाचे वातावरण आहे. अंधाराचा फायदा घेत अनोळखी इसमाकडून पुण्यातील मावळ जवळील कान्हे येथे गोठ्यातील गायीवर ॲसिड हल्ला करण्यात आला, अशी माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मावळ जवळच्या कान्हे गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. कान्हे गावातील तुषार सातकर या शेतकऱ्याची गाय आहे. पहाटे दूध काढण्यासाठी तुषार सातकर हे गोठ्यात गेले होते. मात्र गोठ्याचे दार उघडताच त्यांना समोर धूर दिसला आणि एकच धांदल उडाली. काय झाले हे पाहण्यासाठी सातकर यांनी पुढे धाव घेतली आणि समोरचं दृष्य पाहून ते हादरलेच. त्यांच्या गोठ्यातील एका गायीवर ॲसिड हल्ला करण्यात आल्याने ती चांगली जखमी झाली. गाय गोठ्याच्या दर्शनीय भागत असल्मुळे अज्ञात हल्लेखोराने त्याच्या हातातील ॲसिड गाईच्या पोटावर आणि पायावर टाकून पळून गेला आहे.या हल्ल्यात ती गाय गंभीर जखमी झाली.


या गायीं समोर ४ शर्यतीत धावणाऱ्या बैलजोडी सोबत ,१० म्हशी आणि एक गावरान गाय बांधलेली होती. ही गाय गोठ्याच्या दर्शनीय भागत असल्यामुळे अज्ञात हल्लेखोराने त्याच्या हातातील ॲसिड गाईच्या पोटावर आणि पायावर टाकले. ती गाय गंभीर जखमी झाली असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. मुक्या प्राण्यावर या प्रकारे निर्घृण हल्ला कोणी आणि का बरं केला असावा, असाच मोठा प्रश्न सध्या सर्वांना पडला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!