अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर अवैध वाळू विक्रेत्यांनीच स्वत: पकडुन तहसील कार्यालयात केले जमा
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l तुला मिळेल, का मला मिळेल. अशा आप -आपसातील भांडणातून अवैध वाळू विक्रेत्यांनीच अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर स्वतः पकडून यावल तहसील कार्यालयात जमा केल्याने महसूल व वाळू विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली, या बाबत आच्चर्य ही व्यक्त केले जात आहे. आणि आयत कोलित तहसील कार्यालयात आल्याने ही घटना महसूल विभागाच्या पथ्यावर पड़ली.
यावल -अट्रावल या जुन्या रस्यावरून दुसऱ्याच वाळूच डंपर वाळू विक्रेत्यांनी यावल तहसील कार्यालयात आणून जमा केल्याची माहिती यावल तलाठी ईश्वर कोळी,ड़ो.कठोरा तलाठी वसिम तड़वी, साकळी तलाठी मिलिंद कुरकुरे,बोरखेडा तलाठी शरीफ तडवी यांनी दिली. ही घटना शनिवार दि.२७ रोजी सकाळी ५:३० ते ६३० वाजेच्या दरम्यानची आहे.
याबाबत अधिक चौकशी केली असता, अवैध वाळू विक्रेत्यांमध्ये आप-आपसात, भांडणे झाली.
वाळू भरण्याच्या ठिकाणाच्या कारणावरून दोन वाळू वाहतूक डंपर चालक मालक यांच्यात वाद निर्माण झाला. वाळू डेपोच्या ठिकाणी एकाचे वाळू वाहतूक डंपर दुसऱ्या वाळू विक्रेत्यांनी ताब्यात घेतले या वादात याचा राग धरत काटा काढण्यासाठी दुसरे वाळू भरलेले डंपर वाळू विक्रेत्यांनी पकडून यावल तहसील कार्यालयात जमा केले. आणि ही घटना महसूल अधिकाऱ्यांच्या पथ्यावर पडली. कारण जे वाळूचे डंपर तहसील कार्यालयात जमा केले त्या डंपर चालक मालकावर अवैध वाळू वाहतूक केली म्हणून लाखो रुपयाची दंडात्मक कारवाई होणार असल्याचे समजते.
दरम्यान, यावल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळूची मोठी वाहतूक होत असून महसूल विभाग या कडे दुर्लक्ष करीत असल्याचं बोललं जात .