मुक्ताईनगर

संत मुक्ताई सुत गिरणीला आग, १५ लाखाचे नुकसान

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगाव जवळील संत मुक्ताई सहकारी सुत गिरणीला रविवार दि.२८ एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान शॉट सर्किट मुळे आग लागली, लागलीच अग्निशामक दल घटनास्थळी हजर झाल्याने आग विझवण्यात यश मिळालं,मात्र या आगीत सुमारे १५ लाख रुपयांच नुकसान झाल्याचं सांगितलं गेलं.मात्र कुठलीही जीवित हनी झाली नाही.

या बाबत मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला संत मुक्ताई सहकारी सुत गिरणीचे व्यवस्थापक हेमराज खुशाल पाटील यांच्या खबरीवरून अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!