क्राईममहाराष्ट्रराजकीय

मोठी बातमी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठार मारण्याचा डाव? उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठार मारण्याचा डाव ठाकरेंनी आखला होता, असं वक्तव्य करत असा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते राजू वाघमारे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. इतकंच नाहीतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवून उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचं होतं, असं वक्तव्य देखील राजू वाघमारे यांनी केलं आहे.

तसेच ठाकरेंना पदावरून बाजूला करण्यासाठी संजय राऊत यांनी दोन बैठका घेतल्या होत्या, असाही आरोप राजू वाघमारे यांनी संजय राऊत यांच्यावर केलाय. यासोबत राजू वाघमारे असेही म्हणाले की, उद्धव ठाकरेंना बाजूला करून सरकार स्थापन करण्याचा संजय राऊत यांचा डाव होता, असे वक्तव्य करत राजू वाघमारे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला मोठे गंभीर आरोप केले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!