रावेरसामाजिक

खिर्डी मंडळात ३०० हून अधिक लाभ धारकांची इ – केवायसी

गोलवाडे, ता. रावेर. मंडे टू मंडे, जीवन महाजन | विभागीय अधिकारी फैजपूर व तहसीलदार यांच्या मार्गदर्शनातून व संकल्पनेतून रावेर तहसीलदार रावेर तालुक्यातील विविध गावांमध्ये संजय गांधी योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध काळ योजना राष्ट्रीय विधवा व दिवांग योजना या केंद्र व राज्य शासनाने सामाजिक लाभाच्या योजना अंतर्गत लाभार्थ्यांचे आधार डीबीटी व पडताळणी साठी विशेष शिबिर आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार दिनांक १६ मे रोजी मोजे खिर्डी बुद्रुक मंडळात ग्रामपंचायत सभागृह खिर्डी बुद्रुक येथे भव्य दिव्य शिबिर आयोजन करण्यात आले होते.

मंडळातील व परिसरातील लाभार्थ्यांनी आपल्या मूळ कागदपत्रासह आधार कार्ड बँक पासबुक व संबंधित आधार लिंक असलेला मोबाईल घेऊन सकाळी ८ ते १० या वेळेत उपस्थित राहण्याबाबत तहसील कार्यालयामार्फत यापूर्वीच आव्हान करण्यात आले होते.

याबाबत लाभार्थ्यांनी शिबिराचे ठिकाणी उपस्थित राहण्याबाबत महसूल सेवक यांच्यामार्फत प्रत्यक्ष लाभार्थ्यांना कळविण्यात आले होते याच प्रमाणे खिर्डी मंडळातील खिर्डी बुद्रुक. बलवाडी. शिंगाडी. तांदलवाडी. गाते. या सजेतील गावांमधून सुमारे ३०० पेक्षा जास्त लाभार्थ्यांचे इ केवायसी ची प्रक्रिया करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!