भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

रावेर मध्ये अवैध गोवंश मांस विक्री

रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर शहरातील कुरेशी मोहल्ल्यात एक दाम्पत्य अवैध मांस विक्री करत असल्याची माहिती रावेरचे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बुधवारी पहाटे धाड टाकली. त्यात पशुधनाची हत्या केल्याप्रकरणी पती- पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

नजमाबी मोहम्मद हुसेन भतीयारा (वय ३७) व तिचा पती मोहम्मद हुसेन मोहंमद अहमद (वय ५१) अशी गुन्हा दाखल झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत. पोलिसांनी छापा टाकला असता ही दोघे दुकानात लोखंडी शटर च्या आत सुरा , कुऱ्हाड घेऊन मांस कापताना दिसले.त्यांच्याकडून सुमारे २०० किलो गोवंश मांस किंमत अंदाजे ४० हजार रुपये, कुऱ्हाड, सुरा किंमत ७०० रुपये असे जप्त करण्यात आलेले आहे.

रावेर पोलिसांत नजमाबी मोहम्मद हुसेन भतीयारा (वय ३७) व तिचा पती मोहम्मद हुसेन मोहंमद अहमद (वय ५१) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून रावेरचे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोना कल्पेश आमोदकर पुढील तपास करत आहेत. महिला सहायक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख, पो.कॉ. प्रमोद पाटील, महेश मोगरे, पो.कॉ. विशाल पाटील, सुकेश तडवी, सचिन घुगे, श्रीकांत चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!