ED मोठी कारवाई ! संजय राऊतांची संपत्ती जप्त, ED च्या कारवाईनं खळबळ
मुंबई, मंडे टू मंडे वृत्तसेवा : ईडीने काही दिवसांपूर्वी संजय राऊतांच्या कुटुंबीयांची चौकशी केली होती. आता ईडीने राज्यात मोठी कारवाई केली आहे. ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची अलिबागमधील जमिनीचे आठ तुकडे, दादरमधील एक फ्लॅट जप्त मालमत्ता जप्त केली आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवसेनेच्या बड्या नेत्यावर ईडीने केलेली ही पहिलीच कारवाई म्हणावी लागेल. या कारवाईवरून आता पुन्हा एकदा ईडी विरुद्ध शिवसेना आणि शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगलेला दिसणार आहे.
संजय राऊतांच्या मुलीचं लग्न झालं होतं. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. आता ईडीने थेट कारवाई केली आहे. अलिबागमधील जमीन आणि मुंबईतील एक फ्लॅट जप्त करण्यात आल्याची माहिती मिळतेय. किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत. संजय राऊतांसोबत संपर्क साधला असता, ते म्हणाले मला कुठलाही फोन केलेला नाही. मला नोटीस दिलेली नाही. मी दिल्लीत असून मला याबाबत काहीही माहिती नाही.
१ हजार ४८ कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी कारवाई –
ईडीने १ हजार ४८ कोटींच्या प्रविण राऊत पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने कारवाई केली असून अलिबागजवळील किहीमधील ८ भूखंड जप्त करण्यात आले आहेत. प्रविण राऊत हे संजय राऊतांचे स्नेही आहेत. तसेच मुंबईतील एक फ्लॅट देखील जप्त करण्यात आला आहे. आता संजय राऊत देखील ईडीच्या फेऱ्यात अडकले आहेत.