लोकसभा निवडणुकीत रावेर मतदार संघात जळगाव लोकसभा मतदार संघा पेक्षा जास्त मतदान, तालुकानिहाय टक्केवरी बघा..
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर व जळगाव या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये सोमवारी दि.१३ मे रोजी मतदान घेण्यात आले. रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघातील अंतिम मतदान टक्केवारी प्राप्त झाली आहे. त्यानुसार रावेर मतदारसंघात एकूण सरासरी ६३.०१ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे.तर जळगाव लोकसभा मतदारसंघात एकण सरासरी ५७.७०% टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघात १८ लाख २१ हजार ७५० मतदारां पैकी ११ लाख ४७ हजार ९६५ मतदारांनी मतदान केले. यामध्ये ९ लाख ४१ हजार ७३२ पुरुषांपैकी ६ लाख ८ हजार १५९ पुरुषांनी तर ८ लाख ७९ हजार ९६४ महिलांपैकी ५ लाख ३९ हजार ७९६ महिलांनी मताधिकार बजावला. ५४ तृतीयपंथियांपैकी १० जणांनी मतदान केले.
तर जळगाव लोकसभा मतदारसंघात १९ लाख ९४ हजार ४६ मतदारांपैकी ११ लाख ५० हजार ५३६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. १० लाख ३७ हजार ३५० पुरुषांपैकी ६ लाख २१ हजार ५६३ पुरुषांनी तर ९ लाख ५६ हजार ६११ महिलांपैकी ५ लाख २८ हजार ९५४ महिलांनी मताधिकार बजावीला. ८५ तृतीयपंथियांपैकी १९ तृतीयपंथी यांनी मतदान केले. एकूण ५७.७० % मतदान जळगाव लोकसभा मतदारसंघात झाले.
रावेर लोकसभा मतदारसंघ- विधानसभानिहाय मतदानाची टक्केवारी
चोपडा विधानसभा मतदारसंघ –६१.५२ %
रावेर विधानसभा मतदारसंघ –६७.७७ %
भुसावळ विधानसभा मतदारसंघ –५७.३३ %
जामनेर विधानसभा मतदारसंघ –६०.१८ %
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ –६४.५६ %
मलकापुर विधानसभा मतदारसंघ – ६७.३६ %
जळगाव लोकसभा मतदारसंघ- विधानसभानिहाय मतदानाची टक्केवारी
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ –५२.९० %
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ –६२.६० %
अमळनेर विधानसभा मतदारसंघ –५५.९४ %
एरंडोल विधानसभा मतदारसंघ –६१.७६%
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ –५५.०१ %
पाचोरा विधानसभा मतदारसंघ -५९.८२ %