भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

अनधिकृत होर्डिंग दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर, झाडांवर विषप्रयोग,आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू, ७५ जखमी

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मुंबईत जोरदार तडाखा दिला. या वादळामुळे घाटकोपर येथील छेडानगर भागात पूर्व द्रुतगती महामार्गाजवळच्या पेट्रोल पंपावर अजस्त्र होर्डिंग फाउंडेशनसह उखडून कोसळले. या घटनेमुळे आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर ७५ जण जखमी झाले आहेत.अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांनी या पेट्रोल पंपावर आसरा घेतला होता. मात्र त्याचवेळी पंपालगत उभारलेला एक अवाढव्य होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे थेट पेट्रोल पंपावर कोसळला. या भीषण अपघातामध्ये अनेक गाड्यांचा देखील चुरडा झाला आहे. होर्डिंग आणि पंपाचे छत एकत्रितपणे पेट्रोल पंपावर कोसळल्याने त्याखाली वाहने दाबली गेली. या घटनेनंतर सदर होर्डिंग हे अनधिकृत असल्याचं समोर आलं.या प्रकरणी भावेश भिंडे सह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१२० बाय १२० फुटाचा हा बॅनर राज्य सरकारच्या जागेत अनधिकृत लावल्यामुळे मुंबई महानगरपालिका डिझास्टर अॅक्ट अंतर्गत संबंधित कंपनी आणि रेल्वे प्राधिकरणाविरोधात गुन्हा दाखल केला. याच्या आजूबाजूला तीन अजून मोठे अनाधिकृत होल्डिंग बॅनर आहे त्याच्यावर देखील पालिका कारवाई करत आहे.

झाडांवर विष प्रयोग
याच दरम्यान नवीन माहिती धक्कादायक समोर येत आहे. घाटकोपर येथे याच जागेवर अनधिकृत चार महाकाय जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत. ते फलक दिसावे म्हणून आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग केल्याचेही उघडकीस आले आहे. याप्रकरणी प्रशासनाने फेब्रुवारीत घाटकोपरच्या पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा व मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख मदत
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिले असून दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये देण्याचे जाहीर केले असून जखमींवर सरकारी खर्चाने सर्व उपचार करण्यात येतील.

अनधिकृत होर्डिंग्जचा मुद्दा एरणीवर
मुंबई महापालिकेकडून ४० बाय ४० स्क्वेअर फुट होर्डिंग परवानगी असताना तब्बल १२० स्क्वेअर फुटाचे अनधिकृत होर्डिंग्ज लावण्यात आलं होतं. त्यामुळे ही परवानगी दिली तरी कोणी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महाकाय होल्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं आहे ते अनधिकृत असल्याचे समोर आलं आहे. त्या होर्डिंग्जला महापालिकेकडून नोटीस देण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईमधील हजारोंनी असलेल्या अनधिकृत होर्डिंग्जचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला असून, दरम्यान, अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी मुंबईतील सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक होर्डिंग्ज तात्काळ हटविण्याचे निर्देश दिले आहेत.

६ कोटी १३ लाखांचा दंड

मुंबई महानगरपालिकेने अपघात झाल्याच्या दिवशी हे होर्डिंग लावणाऱ्या ‘इगो मिडीया’ कंपनीला होर्डिंग बेकायदेशीर असल्याची नोटीस पाठवली होती. कंपनीला ६ कोटी १३  लाखांचा दंड भरण्याचे आदेश महानगरपालिकेने दिले होते. तर दुसरीकडे रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘इगो मिडीया’ कंपनी आधीच काळ्या यादीत टाकण्यात आली आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!