भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

Breaking : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रणधुमाळी लवकरच

नवी दिल्ली, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : राज्यातील रखडलेल्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका, नगरपालिका निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला जिथं पाऊस नसेल तिथं निवडणूक घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळं पावसाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका टप्प्याटप्प्यानं होण्याची शक्यता असून लवकरच निवडणूकांचे बिगुल वाजण्याचे संकेत मिळाले आहे.

ज्या ठिकाणी फार पाऊस पडत नाही त्या ठिकाणी निवडणुका घ्यायला हरकत काय आहे? असा प्रश्न कोर्टाने विचारला आहे. जिल्हानिहाय आढावा घेऊन निवडणुकांचा कार्यक्रम तयार करावा असंही कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोग निवडणुकांबाबत कशाप्रकारे निवडणुका घेतं हे पहावं लागेल.

सुप्रीम कोर्टाने म्हटलं, ज्या ठिकाणी पाऊस कमी असतो अशा ठिकाणी निवडणुका थांबवण्याची काय गरज आहे? जिल्हानिहाय आणि प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्यानुसार निवडणुकीचा कार्यक्रम तयार करावा. ज्या ठिकाणी जास्त पाऊस असतो उदाहरणार्थ कोकण, मुंबई सारख्या भागात आम्ही निवडणूक आयोगाची पावसामुळे होणारी अडचण आम्ही समजू शकतो. या ठिकाणी पावसाळ्यानंतर निवडणुका घेऊ शकतो. त्यानुसार निवडणुकांचा कार्यक्रम तयार करावा.

सुप्रीम कोर्टाने पुढे म्हटलं, ज्या ठिकाणी पाऊस कमी असतो अशा ठिकाणी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यापर्यंत थांबण्याची गरज नाही. त्यामुळे आता निवडणूक आयोग कशा प्रकारे निवडणुकांचा क्रयक्रम आखतं हे पहावं लागेल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!