राजकीयराष्ट्रीय

…..काँग्रेसला मतदान करण्यापेक्षा तुम्ही सरळ भाजपला मतदान करा …काँग्रेसचे दिग्गज नेते, लोकसभा उमेदवाराच्या वक्तव्याने खळबळ

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l प्रचार सभेत भावनेच्या भरात कोण काय बोलून जाईल हे सांगताच येत नाही. सध्या लोकसभेच्या. निवडणुका सुरू आहे सर्वच पक्षांचा जोरात प्रचार सुरू असून प्रचारात अनेक रंजक घटना घडत आहेत. एक मेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. परंतु एकाच आघाडीत असलेल्या पक्षांकडून एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडली जात नाही. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. यामुळे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि बहरामपूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार अधीर रंजन चौधरी यांनी सरळ तृणमूल काँग्रेसला मतदान करण्यापेक्षा भाजपला मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले आहे .त्यांच्या या वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे.


त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तृणमूल कांग्रेस आक्रमक झाला आहे. तृणमूलने अधीर रंजन यांना भाजपची बी-टीम म्हटले आहे.पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जागा वाटप न होण्यामागे अधीर रंजन चौधरीच जबाबदार आहे. ते बंगाला विरोधक आहेत. ते भाजपचे डोळे आणि कान म्हणून काम करत आहेत. तसेच भाजपचा प्रचार करत आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे नेते उघडपणे भाजपसाठी मतदान मागत आहेत. बंगालमध्ये टीएमसी ‘इंडीया’ आघाडीच्या वतीने भाजपविरुद्ध लढवत आहे. परंतु काँग्रेस आणि सीपीएम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निष्ठावंत बनत आहे. हे घृणास्पद आणि निर्लज्जपणाच्या पलीकडे आहे.

या प्रकरणात काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी टीएमसी ‘इंडिया’ आघाडीचा भाग असल्याची सरवासारव केली आहे.

अधीर रंजन चौधरी यांचा सभेतील हा व्हिडिओ व्हायरल झाल्या नंतर हा व्हिडिओ तृणमूल काँग्रेसने आपल्या X अकाउंटवरुन टि्वट केला आहे. या व्हिडिओमध्ये अधीर रंजन चौधरी टीएमसीला मतदान करण्यापेक्षा भाजपला मतदान करण्याचे वक्तव्य करताना दिसत आहेत. त्यावर तृणमूल काँग्रेसची प्रतिक्रिया आली आहे. त्यात म्हटले आहे की, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जागा वाटप न होण्यामागे अधीर रंजन चौधरीच जबाबदार आहे. ते बंगाला विरोधक आहेत. ते भाजपचे डोळे आणि कान म्हणून काम करत आहेत. तसेच भाजपचा प्रचार करत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!