क्राईमयावल

घरफोडी प्रकरणी मध्यप्रदेशातील दोन आरोपींना यावल पोलिसांनी केली अटक

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्कl  यावल तालुक्यातील वढोदा या गावातील रिक्षा चालकाच्या घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले १ लाख ५० हजार रूपयांची रोकड आणि सोन्याच्या दागीन्यांसह मोबाईल असे एकूण २ लाख २४ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या मध्यप्रदेशातील दोन चोरट्यांना यावल पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील वढोदा येथील रिक्षा चालक प्रदीप दिनकर सपकाळे यांच्या घरात दि. २८ व २९ एप्रील रोजीच्या दरम्यानच्या मध्यरात्रीच्या सुमारास सपकाळे कुटुंब हे आपल्या घराच्या छतावर झोपलेले असतांना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले १ लाख ५० हजार रूपयांची रोकड आणि सोन्याच्या दागीन्यांसह मोबाईल असे एकूण २ लाख २४ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची पसार घटना घडली होती.या बाबत यावल पोलिस स्टेशनला तक्रार करण्यात आली होती.

पोलीसांच्या पथकाने या घरफोडीच्या गुन्ह्याबाबत संशयित आरोपी रेवलसिंग उर्फ सावन गुलसिंग बारेला वय-२८, रा. जामन्या ता. भगवानपुरा जि.खरगोन व मेगलासिंग उर्फ सेवकराम दलसिंग सोलंकी वय-३० वर्ष रा. बोकरान्या ता. भगवानपुरा जि. खरगोन या दोघांना अटक केली असून या गुन्ह्यातील आरोपीच्या शोधकामी यावलचे पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस उपनिरिक्षक सुनिल मोरे, पोलीस उपनिरिक्षक मुजफ्फर खान पठाण, स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ किरण धनगर यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!