मारुळ येथे मोबाईलचे टॉवर बनले शोपीस,रेंज नसल्याने हजारोंचा मोबाईल बिनकामाचा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
फैजपूर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। यावल तालुक्यातील फैजपूर येथून जवळच असलेल्या मारूळ गावात मागील काही दिवसापासुन सर्वच मोबाइलची टावर रेंज मिळत नसल्याने गावात मोबाईलचे टॉवर शोपीस बनलेले दिसून येत आहे, मोबाइल धारकांची संपर्क अभावी मोठी गैरसोय निर्माण झाली असुन मोबाइल मध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध सिमकार्ड कंपन्यांबद्दल नाराजी व्यक्त होत आहे .
यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेले सुमारे १६ सोळा हजार लोकवस्तीच्या मारूळ या गावात हजारो नागरीक हे मोबाइलधारक असुन मागील अनेक दिवसापासुन सर्व कंपन्याच्या सिमकार्डाची रेंज मिळत नसल्याने मोबाइल धारक ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे . आजच्या परिस्थितीत संगणकीय प्रणालीच्या युगात मोबाइल हे संपर्क साधण्याचे सर्वात महत्वाचे यंत्र एक प्रमुख साधन बनले असुन , प्रत्येक नागरीका जवळ मोबाइल असुन, या मोबाइल (सेलफोन )यंत्रात देशातील जिओ , एअरटेल , आयडीया अशा विविध नामवंत कम्पन्यांची सिमकार्ड आहेत मात्र मारूळ तालुका यावल या गावात हजारो मोबाइल यंत्र युर्जस आहेत मात्र तांत्रीक अडचणीमुळे किंवा अनियमित विद्युत पुरवठामुळे रेंज मिळत नसल्याने अनेक तास मोबाइल यंत्र बंद अवस्थेत राहतात त्यामुळे मोबाइलधारक ग्राहकांच्या अनेक कामांसाठी संपर्क अभावी अडचणी निर्माण होत असुन, या सर्व समस्याकडे संबंधीत सिमकार्ड कम्पन्यांनी तात्काळ आपल्या सिमकार्ड युर्जस ग्राहकांच्या समस्या कडे लक्ष द्यावे अशी मागणी मारूळ व गावाच्या परिसरातील मोबाइलधारक ग्राहकांकड्डन केली जात आहे .