भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलशैक्षणिक

कुसुमताई चौधरी माध्यमिक विद्यालयात विज्ञान दिन साजरा

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

फैजपूर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। नुकत्याच झालेल्या विज्ञान दिन उपक्रमात फैजपूर येथील कुसुमताई विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने भाग घेतला. यात सुरुवातीला 7 वी च्या मुलींनी डोळे उघडूनी बघा हे अंधश्रद्धा निर्मूलनपर विज्ञान गीत तालासुरात म्हणून कार्यक्रमाला सुरुवात केली.

यात विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे फायदे तोटे आपल्या भाषणाद्वारे सांगितले. तर विज्ञान शिक्षक दीपक होले यांनी परिसराचे हेतुपूर्वक सातत्याने निरीक्षक करून माहिती मिळविणे आणि निष्कर्ष काढणे म्हणजे विज्ञान होय. तसेच प्रत्येक घटना का, केव्हा,कशी घडते बघा.असे त्यांनी उदाहरणाद्वारे समजावून सांगितले.
विज्ञानदिन हा सी व्ही रमण यांच्या रमण इफेक्ट या संशोधन पर दिवसांवर साजरा केला जातो असे मुख्याध्यापक श्री एस जे तळेले सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.
कार्यक्रम संपन्न होणेसाठी श्री बी एम बोंडे.दीपक होले,श्री एल जे बोंडे,प्रीती चौधरी,ए.डी बाक्षे आणि कुणाल तायडे यांनी परिश्रम घेतले

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!