भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

सावदा – रावेर दरम्यान महामार्गावर भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | बऱ्हाणपूर – अंकलेश्वर महामार्गावरील सावदा ते रावेर दरम्यानच्या रस्त्यावर आज गुरूवार दिनांक २६ जून रोजी सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने मस्कावद येथे एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

ही घटना आज गुरुवारी सकाळी ९:३० च्या सुमारास अंकलेश्वर-बुऱ्हानपूर महामार्गावरील हॉटेल कुंदनजवळ घडली. मस्कावद सिम (ता. रावेर, जि. जळगाव) येथील रहिवासी हर्षल नारायण सरोदे (वय ४५) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांचे सहकारी हर्षल बाजीराव पाटील (वय ४३) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती अशी की, हर्षल सरोदे व हर्षल पाटील हे सीडी डॉन हिरो होंडा दुचाकी (क्र. MH-19-AD-0185) वरून सावद्याहून आपल्या गावी मस्कावद सिम कडे निघाले होते. दरम्यान, महामार्गावरील सावदा – भारतीक बुवा दरम्यानच्या हॉटेल कुंदनजवळ भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालविण्यात येत असलेला टाटा ट्रक (क्र. PB-65-BB-9182) चालक सतविंदरसिंग अमरजितसिंग (वय ३७, रा. अवानकोट, रुपनगर, पंजाब) याने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.

घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पुंडलिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. उमेश पाटील व पो.कॉ. विजय पोहेकर यांनी पंचनामा केला. याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.पप्पा

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!