भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

१२ तासांत चोरी उघडकीस – मुक्ताईनगर पोलिसांची यशस्वी कारवाई

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | ता. २५ जून २०२५: मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या एका बंद घराच्या चोरीचा गुन्हा केवळ १२ तासांत उघडकीस आणत पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून सुमारे ४०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

वैभव विकास पाटील (रा. निमखेडी बु., ता. मुक्ताईनगर) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चांदीचे देव, मोबाईल फोन, रोख रक्कम व मोटारसायकल असा एकूण ५६,००० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक CCTNS NO. 204/2025, भा.दं.वि. कलम ३३१ (४), ३०५ प्रमाणे दिनांक २३ जून २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास पो.हे.कॉ. ३३७७ अशोक जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला होता. पोलीस अधीक्षक मा. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कृष्णांत पिंगळे आणि पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत अवघ्या १२ तासांत दोन आरोपींचा छडा लावण्यात आला.

ताब्यात घेतलेले आरोपी पुढीलप्रमाणे:
१) गोपाल उर्फ सुरेशसिंग सिमाभाई सोलंकी
२) गणेश सिमाभाई सोलंकी
(दोघेही रा. चिखल्या, ता. अंजड, जि. बडवाणी, मध्यप्रदेश; सध्या राहीवासी सिनफाटा, हलखेडा, ता. मुक्ताईनगर)

दोन्ही आरोपी गेल्या १० वर्षांपासून स्थानिक शेतकऱ्यांकडे काम करीत होते. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून ३०,००० रुपये किमतीची मोटारसायकल, ५,००० रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल, आणि ५,००० रुपये किमतीचे चांदीचे देव असा एकूण ४०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी पो.हे.कॉ. अशोक जाधव, पो.ना. प्रदीप इंगळे, हरीश गवळी, पो.अं. अनिल देवरे, सागर साबे व प्रविण जाधव यांनी यशस्वीपणे पार पाडली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!