भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

चाळीसगाव

कन्नड घाटात पिकअपचा भीषण अपघात, ३ ठार, ४ गंभीर जखमी, १३ किरकोळ जखमी

चाळीसगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | चाळीसगाव शहराजवळील कन्नड घाटात पिकअप चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात चाळीसगाव तालुक्यातील ३ जण ठार झाले असून १७ जण जखमी झाले आहेत. त्यातील ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.

चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा गावातील महाजन कुटुंब अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीराम पूर तालुक्यातील बेलापूर येथे जाऊळच्या कार्यक्रमासाठी गेले होते. परतीचा प्रवास सुरू असताना ते येत असलेल्या पीकअप क्रमांक एम एच १९ बी एन १९४७ या गाडीच्या चालकाचे चाळीसगाव जवळील कन्नड घाटाच्या पायथ्याशी चालकाचे नियंत्रण सुटल्याने आपघात होऊन नाल्यात उलटून भीषण अपघात झाला.

त्या भीषण अपघातात नाना दामू माळी वय ५८ वर्ष. रा. पातोंडा. ता. चाळीसगाव. राहुल लक्ष्मण महाजन. वय ३५ वर्ष. रा. गुढे. ता. चाळीसगाव. सावित्री बाई मधुकर माळी. वय ६५ वर्षे. रा. पातोंडा. ता. चाळीसगाव. यांचा मृत्यू झाला तर निंबा काळू महाजन .वय ७० वर्ष. रा.पोहरे. संदीप संपत माळी. वय. ३८ वर्ष. रा. ३८ वर्ष. रा. पाहण. अनिकेत रमेश माळी. वय १६ वर्ष. रा. पातोंडा. सुनीता रमेश माळी. वय २६ वर्ष. पातोंडा हे गंभीर जखमी झालेले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे दाखल करण्यात आले असून इतर जखमींना चाळीसगाव येथे रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर पिकअप चालक गोपीचंद निंबा माळी याचे विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!