भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

श्रीक्षेत्र कुंडलेश्वर येथील भगवान श्रीकुंडळेश्वर गोशाळेतील चाऱ्याच्या गोडाऊनला आग; सुमारे १० लाखांचे नुकसान

नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ. दीपक लोखंडे | नशिराबाद येथून जवळच असलेल्या सदगुरू झेंडूजी महाराज बेळीकर संस्थान, श्रीक्षेत्र कुंडलेश्वर, बेळी येथे शुक्रवारी दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास भगवान श्रीकुंडलेश्वर गोशाळेतील भाकड गायींच्या चाऱ्याच्या गोडाऊनला अचानक उन्हाच्या अतिशय तीव्रतेत आग लागल्याची घटना घडली. या आगीत अंदाजे १०० आयशर चारा जळून सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

आग लागल्यानंतर गोडाऊनमधील चारा वाचवण्यासाठी बेळी गावातील तरुण मंडळ आणि संस्थेचे सेवेकरी आणि कर्मचारी यांनी तत्काळ धाव घेतली. नशिराबाद नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष योगेश पाटील यांना माहिती दिल्या बरोबर त्यांनी नशिराबाद अग्निशमन दलाची गाडी संस्थान वर पाठविली तीच्या सहाय्याने पाणी मारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच, उरलेला चारा बाहेर काढण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने बचावकार्य राबविण्यात आले. नशिराबाद येथील अग्निशमन दलाची गाडी वेळेवर घटनास्थळी पोहोचल्याने आग नियंत्रणात आणणे शक्य झाले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

सदर गोशाळेत सुमारे ३०० ते ३५० गायींचा समावेश असून, तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या या आगीमुळे गाईंच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर गोशाळेच्या सेवादाते व दानदाते यांनी पुढे येऊन गाईंसाठी चारा दान करावा असे आवाहन उपस्थित गोसेवकांनी व्यक्त केले. ज्यांना मदत करावयाची आहे त्यांनी थेट संस्थेशी संपर्क साधावा.
सद्गुरु झेंडूजी महाराज असो… +91 84591 57300

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!