भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

यावल तालुक्यातील संतापजनक घटना : अल्पवयीन मुलीचा बालविवाह, लैंगिक अत्याचारातून मुलीने दिला बाळाला जन्म

यावल, मंडे टु मंडे न्युज | यावल तालुक्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने बालविवाह लावून देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या अत्याचारामुळे अवघ्या १५-१६ वर्षांच्या पीडितेने एका गोडस बालकाला जन्म दिला आहे. पीडित मुलीचे लग्न लाऊन देण्यात तिचे आई वडील सुद्धा सामील आहेत.

मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील मौजे सांगवी बुद्रुक (ता. यावल) येथील रहिवासी अक्षय उर्फ बंटी राजेंद्र सोनवणे (वय २६) याने पीडिता अल्पवयीन असल्याचे माहित असूनही तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. विशेष म्हणजे, पीडितेच्या स्वतःच्या माता-पित्यांनीच या कृत्यात साथ देत, राहत्या घराजवळील तिचा अक्षय सोनवणे सोबत विवाह लावून दिला. विवाहानंतर ‘तू आता माझी पत्नी आहेस’ असे भासवून आरोपीने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. या छळामुळे पीडिता गरोदर राहिली आणि तिने दि. २८ एप्रिल २०२६ रोजी एका मुलाला जन्म दिला.

सदरचा प्रकार सोलापूर ग्रामीणमधील करमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला होता. मात्र, घटनेचे मूळ ठिकाण जळगाव जिल्ह्यातील यावल असल्याने हा गुन्हा शून्य क्रमांकाने यावल पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी यावल पोलिसांनी आरोपींविरुद्ध पोक्सो कायदा कलम ४, ६, ८, १२., बालविवाह प्रतिबंधक कायदा कलम ९, १०, ११. कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आह.या गंभीर गुन्ह्याचा तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मसलुद्दीन शेख करत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!