खरात नंतर आणखी एका भामट्याचा पर्दाफाश, उच्चशिक्षित ११ महिलांना गंडा, नेमकं काय आहे प्रकरण…
मुंबई, मंडे टु मंडे न्युज | नाशिक मधील भोंदूबाबा अशोक खरातच्या अनेक वेगवेगळ्या कारनाम्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरले असतानाच, नवी मुंबई मधून आणखी एक असाच महिलांच्या लैंगिक शोषणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मोठ्या अधिकाऱ्यासारखे राहणीमान ठेवून आरोपी तरुण हा डॉक्टर, इंजिनीअर आणि बँक अधिकारी यांसारख्या उच्चशिक्षित महिलांना हेरायचा. लग्नाच्या भूलथापा देऊन त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा अशा इस्रोमध्ये शास्त्रज्ञ असल्याचे सांगून उच्चशिक्षित व उच्चभ्रू महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या भामट्या तरुणाला नवी मुंबई गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. हा ३५ वर्षीय आरोपी विशेषत: ३० वर्षीय महिलाना लक्ष करीत असे. त्यात विशेषत लग्न न झालेल्या व घटस्फोटीत महिला. त्यांना लग्नाचे आमिष दाखवून फसवत असे. पुण्यातील एका
नेमकं काय आहे प्रकरण?
आदर्श म्हात्रे नामक भामट्या तरुणाने डझनभर महिलांचे लैंगिक व आर्थिक शोषण केल्याचे समोर आले आहे. केवळ दहावी पास असलेल्या आदर्शने विवाह जुळवणारी संकेतस्थळे व अन्य सोशल मीडिया व्यासपीठांवर बनावट प्रोफाइल तयार केली होती. कधी इस्रोचा शास्त्रज्ञ, तर कधी ‘पीडब्ल्यूडी’मध्ये उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे तो सांगायचा. राहणीमान मोठ्या अधिकाऱ्यासारखे ठेवून तो डॉक्टर, इंजिनीअर आणि बँक अधिकारी यांसारख्या उच्चशिक्षित महिलांना हेरायचा. लग्नाच्या भूलथापा देऊन त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे आणि त्यानंतर पैशांची गरज असल्याचे भासवून लाखो रुपये उकळणे, ही त्याची ‘मोडस ऑपरेंडी’ होती.
आदर्श हा एका महिलेकडून लुबाडलेले पैसे दुसऱ्या महिलांसाठी वापरायचा. उरलेली रक्कम तो मौज मजा व चैनीच्या आयुष्यावर, तसेच कॅसिनोमध्ये उडवायचा. त्याने केवळ नवी मुंबईतच नव्हे, तर ठाणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड, नागपूर आणि यवतमाळ अशा विविध शहरांतील अनेक महिलांना जाळ्यात ओढले असून, आत्तापर्यंत त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यांत ११ गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिस निरीक्षक सुनील शिंदे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक तपासाद्वारे आदर्शला अटक केली. या प्रकरणात फसवणूक झालेल्या महिलांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शास्त्रज्ञाची बोगस १२ नावे वापरली
पोलिस तपासात आदर्श म्हात्रेने स्वप्नील वारुळे, हेमंत गायकर, नहुश म्हात्रे, रूद्रेश गोंधळी अशी वेगवेगळी नावे वापरल्याचे आढळून आले आहे. तो अत्यंत चलाखीने आपली ओळख बदलून महिलांचा विश्वास संपादन करायचा. नाशिकच्या अशोक खरातने भोंदूबाबाचा मुखवटा ओढून महिलांची फसवणूक केली, त्याच धर्तीवर आदर्शने बोगस शास्त्रज्ञ बनून महिलांच्या आयुष्याशी खेळ केल्याचे उघडकीस आले आहे.
पोलीस आयुक्तांचं आवाहन
आदर्शने अनेक महिलांचे शोषण केले असल्याचा अंदाज असून बदनामीच्या भीतीने अनेक पीडित महिला तक्रार देण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. महिलांनी विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळांवरील व्यक्तीची पूर्ण खातरजमा केल्याशिवाय कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत. शिवाय कोणाची फसवणूक झाली असेल, तर त्यांनी न घाबरता तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन
प्रेरणा कट्टे, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा
