भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

जिल्हा परिषदेच्या पुन्हा ४ कर्मचाऱ्यांचे निलंबन, निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या ८ वर

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्याच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या आदेशानुसार राज्यातील दिव्यांग कर्मचारी व दिव्यांग व्यक्तींच्या दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.या तपासणीत जिल्हा परिषदेच्च्या ४ कर्मचाऱ्यांची निकषानुसार टक्केवारीत तफावत आढळून आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी चौघा कर्मचाऱ्याविरुद्ध बुधवार दि १४ जानेवारी रोजी निलंबनाची कारवाई केली आहे. या पूर्वी ४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून आतापर्यंत एकूण ८ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.या घटनेने जळगाव जिल्हा परिषदेत बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत दिव्यांग कर्मचारी यांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात जळगाव जिल्हा परिषदेच्या विविध आस्थापनावर कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांची देखील तपासणी करण्यात येत आहे. या तपासणी दरम्यान
भालचंद्र नारायण पवार, आरोग्य सहाय्यक जिल्हा प्रशिक्षण केंद्र जळगाव, छाया घनश्याम भोळे, आरोग्य सहाय्यक प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोड, संदीप विनायक सोनवणे, आरोग्य सेवक प्राथमिक आरोग्य केंद्र तरवडे ता. चाळीसगाव व गणेश मुरलीधर महाजन, आरोग्य सहाय्यक पिंपरखेड ता. भडगाव या कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग टक्केवारी तफावत आढळून आल्याने या कर्मचाऱ्याविरुध्द निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

तपासणी दरम्यान भालचंद्र नारायण पवार, आरोग्य सहाय्यक जिल्हा प्रशिक्षण केंद्र जळगाव, छाया घनश्याम भोळे, आरोग्य सहाय्यक प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोड, संदीप विनायक सोनवणे, आरोग्य सेवक प्राथमिक आरोग्य केंद्र तरवडे ता. चाळीसगाव व गणेश मुरलीधर महाजन, आरोग्य सहाय्यक पिंपरखेड ता. भडगाव या चौघांच्या दिव्यांग टक्केवारीत तफावत आढळून आली.

या पूर्वी देखील दिव्यांग कर्मचारी तपासणीत टक्केवारी तपासणीत तफावत आढळून आलेल्या चार कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे ही संख्या ८ झाली आहे. आणखी काही कर्मचारी निलंबनाच्या वेटींग वर असून त्यांचे सुध्दा निलंबन होणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!