तासखेडा अवैध उत्खनन : अर्थपूर्ण व्यवहारातून संबंधित अधिकारी मूग गिळून? प्रकरण थंड बस्त्यात?
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज | रावेर तालुक्यातील तासखेडा येथील हजारो ब्रास मातीचे अवैध उत्खनन करून वाहतूक करण्यात आली. तक्रार झाल्या पासून पुरावे असतानाही चौकशीत असलेल्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने प्रकरण थंडबस्त्यात पडून आहे. शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावण्यात आला आहे.मात्र कारवाई का होत नाही?
रावेर तालुक्यातील तापी काठावरील तासखेडा शिवारातील हतनूर धरण कालव्यातील मातीचे उत्खनन/ वाहतूक प्रकरणी आदरच मालमत्ता ही जलसंपदा विभागाची मालकीची असल्याने उपविभागीय अधिकारी पाटबंधारे उपविभाग सावदा यांना या बाबत गुन्हा दाखल करण्या बाबत कळविण्यात आले आहे.
मात्र सदरचे प्रकरणात विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी हात ओले केले असल्याची चर्चा असून म्हणून अद्याप कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही. चौकाशीत संशयित व्यक्ती कडे जेसीबी व वाहने नसल्याचे सांगितले गेले मात्र ही लपवलापवी असून वस्तुस्थिती अशी आजखे की, प्रत्यक्षात ही वाहने शातिर व्यक्तीने दुसऱ्यांच्या नावावर घेतली असल्याची विश्वसनीय माहिती आहे. या बद्दल संबंधित सर्वांना माहितीच आहे. मात्र “घोड्यां न कुठे दान खाल्ले” हे जनतेला सर्व माहिती आहे… इतकेच नव्हे तर . गेल्या काही दिवसांपूर्वी संबंधिताने उत्खननात वापरलेले जेसीबी विकल्याचीही माहिती मिळत आहे. शासनाचे कोट्यवधी रुपयांचे मोठे नुकसान झाले आह. तो दंड म्हणून वसूल करण्यात येईल का?
तूर्त एव्हढेच…!
…….(भाग – ५)…

