जळगावात जागतिक पशुवैद्यकीय दिनानिमित्त मोफत अँटी रेबीज (ARV) लसीकरण शिबिर
नशिराबाद. मंडे टु मंडे न्युज. डॉ. दीपक लोखंडे | जागतिक पशुवैद्यकीय दिनाचे औचित्य साधून जळगाव येथील पशुवैद्यकीय विभाग व महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यकीय संघटना, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पाळीव तसेच भटक्या श्वानांसाठी मोफत अँटी रेबीज लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन जिल्हा उपयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध विकास अधिकारी डॉ. श्यामकांत हिरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमा दरम्यान एकूण ११७ श्वानांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी डॉ. धांडे (सहाय्यक आयुक्त), डॉ. शिंदे (सहाय्यक आयुक्त), डॉ. रामदास जाधव तसेच पशुसंवर्धन विभागातीलt सेवानिवृत्त अधिकारी डॉ. नारखेडे, डॉ. राणे आणि डॉ. पी. बी. पाटील हे उपस्थित होते.
शिबिरात जिल्हा पशु सर्व चिकित्सालयातील डॉ. निलेश चोपडे, डॉ. बोराखेडे आणि डॉ. सोनोने यांनी श्वानांचे लसीकरण करत मार्गदर्शन केले. तसेच डॉ. विकास इंगळे (जिल्हाध्यक्ष, महाव्हेट), डॉ. प्रशांत येवले (कार्यकारी अध्यक्ष), डॉ. अतुल नेहेते आणि डॉ. निलेश बारी यांनीही उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाला सहकार्य केले.
