भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा वाढ ..

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. १ मार्च २०२६ रोजी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ केली. तथापि, ही वाढ व्यावसायिक गॅस सिलिंडर (१९ किलो) वर लागू होते. त्यामुळे व्यावसायिकांच्या खिशाला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीत कुठलीही वाढ झालेली नाही.
.

देशभरात कमर्शियल एलपीजी गॅसच्या किंमती बदलल्या आहेत. या किंमतीत २८ रुपयांनी वाढ झाली आहे. आता तुम्हाला १९ किलो वजनाचा एलपीजी गॅस सिलेंडर १७६८.५० रुपयांना मिळणार आहे. याआधी हा दर १७४०.५० रुपये होता. त्यामुळे रेस्टॉरंट, हॉटेल आणि लहान व्यवासायिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

गेल्या काही महिन्यापासून घरगुती १४.२किलोच्या गॅसच्या किमती जैसे थे आहेत. घरगुती गॅसच्या किंमती मुंबईत ८५२.५० रुपये आहेत. दिल्लीत घरगुती गॅसच्या किंमती ८५३ रुपये आहेत. कोलकत्त्यात घरगुती गॅसच्या किंमती ८७९ रुपये आहेत. चेन्नईत घरगुती गॅसच्या किंमती ८६८.५० रुपये आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!