भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

आदिवासी संस्कृतीतील वस्तूंना जागतिक बाजारपेठ, रावेर तालुक्यातील “वारली पेंटिंग्स” विविध प्रदेशांसह थेट ऑस्ट्रेलियातही

भानुदास भारंबे

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |बेरोजगारातून रोजगार ओळख करून त्यांची पेंटिंग विदेशात गेली.. अशा जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील लोहारा येथील आशियाना बचत गटाच्या प्रमुख हीना अजित जमादार यांच्या” वारली पेंटिंग्स” आणि तयार केलेल्या विविध वस्तू आता भारतातील विविध प्रदेशांसह थेट ऑस्ट्रेलियातही पोहोचल्या आहेत. आदिवासी संस्कृती जतन आणि संवर्धन करण्याच्या या कामाबरोबरच तेथील स्थानिक महिलांना यातून रोजगार निर्मितीही होत आहे. हाताने तयार केलेल्या वारली पेंटिंग चे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

रावेर तालुक्यातील सातपुड्यातील लोहारा या लहानशा आदिवासी गावातील हिना अजीत जमादार या वारली चित्रकलेच्या कुशल कलाकाराने आदिवासी संस्कृतीला नवसंजीवनी देताना एक प्रेरणादायी यशकथा घडवली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत रावेर तालुक्यातील रोझोदा येथे कामसिद्ध देवस्थान हॉल येथे दिनांक २३ जून रोजी पार पडलेल्या  ‘सावित्रीबाई फुले महिला प्रभाग संघ-खिरोदा, चिनावल (ता. रावेर)’ येथे पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने त्यांच्या अनोख्या कलाकृतीने मान्यवरांचे लक्ष वेधले.

या  वेळी हिना जमादार यांनी स्वतःच्या हाताने काढलेल्या आकर्षक वारली भित्तीचित्र फ्रेम्स जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, आमदार अमोल जावळे, तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांना सप्रेम भेट दिल्या. या कलेच्या माध्यमातून आशियाना महिला बचत गट, लोहारा व हिना वारली आर्ट्स अँड गॅलरी यांचे कार्य विशेष अधोरेखित झाले.

हीना जमादार या वॉटरप्रूफ आणि दर्जेदार मटेरियल वापरून विविध चित्रे आणि नक्षी काढतात. आपल्या सोबतच्या आदिवासी महिलांना व्यवसाय द्वारे रोजगार मिळावा म्हणून त्यांना त्या प्रशिक्षण देतात. त्याबरोबरच पेंटिंग्ससाठी लागणारे साहित्य निर्माण करणे, या पेंटिंग्स बाहेरगावी पाठविण्यासाठी लागणारे बॉक्स तयार करणे आदी प्रशिक्षण आदिवासी महिलांना दिले जाते.

हिना जमादार यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली हिना वारली आर्ट्स अँड गॅलरी ही आदिवासी तडवी महिलांच्या हातातील कलेचा जागतिक पातळीपर्यंत प्रवास घडवून आणणारी प्रेरणादायी मोहीम ठरली आहे. वारली चित्रकलेच्या माध्यमातून या महिला स्थानिक पातळीवरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमठवत आहेत. सोशल मिडिया व स्थानिक बाजारपेठांमधून त्यांच्या कलाकृतींना चांगली मागणी मिळत असून, महिलांच्या जीवनात आर्थिक व सामाजिक बदल घडवून आणण्यात या उपक्रमाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

या प्रसंगी आमदार जावळे व सीईओ मॅडम करनवाल यांनी हिनाच्या कार्याची माहिती घेऊन तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांनी हिनासारख्या महिलांकडून ग्रामीण भागातील महिलांसाठी रोजगारनिर्मितीची मोठी संधी असल्याचे नमूद केले.महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कक्षाच्या माध्यमातून त्यांचा “आशियाना बचत गट” स्थापन केला. या माध्यमातून त्यांनी त्यांना स्वतः येत असलेल्या विविध वारली पेंटिंग्स, की चेन, चहा पाण्याचा ट्रे आदी विविध वस्तू तयार करायला सुरुवात केली. पंचायत समितीच्या शासकीय सेवेत असलेले त्यांचे पती अजित जमादार यांनी त्यांना मदत आणि मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कक्षाच्या माध्यमातून त्यांचा “आशियाना बचत गट” स्थापन केला. या माध्यमातून त्यांनी त्यांना स्वतः येत असलेल्या विविध वारली पेंटिंग्स, की चेन, चहा पाण्याचा ट्रे आदी विविध वस्तू तयार करायला सुरुवात केली. पंचायत समितीच्या शासकीय सेवेत असलेले त्यांचे पती अजित जमादार यांनी त्यांना मदत आणि मार्गदर्शन केले.

या उपक्रमामुळे हिना जमादार या एक यशस्वी आदिवासी महिला उद्योजिका म्हणून पुढे आल्या असून, त्यांच्या कार्याचे संपूर्ण रावेर तालुक्यातून कौतुक होत आहे. आदिवासी महिलांचे कौशल्य, मेहनत आणि जिद्द यांच्या बळावर ग्रामीण भागातूनही मोठे यश मिळवता येते, हे त्यांनी सिद्ध केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!