जळगाव जिल्हा पोलिस दलातील ६ सहाय्यक पोलिस निरीक्षकांसह १३ पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्हा पोलीस दलात पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी ६ सहाय्यक पोलिस निरीक्षकांसह १३ पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. तर चार अधिकार्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत.
बदली झालेले अधिकारी….
सहाय्यक निरीक्षक अजयकुमार वाढवे यांची यवतमाळ येथून यावल येथे, सहाय्यक निरीक्षक संजय निकुंभ , पुणे शहर येथून पाचोरा येथे. नाशिक एसीबी चे सहा.निरीक्षक नितीन पाटील यांची बाजारपेठ, भुसावळ येथे. सहा.निरीक्षक गणेश फड यांची नियंत्रण कक्ष जळगाव येथून जळगाव आर्थिक गुन्हे शाखा. मानव संसाधन विकास च्या सहा.निरीक्षक योगीता नारखेडे, यांची एएचटीयू मध्ये. पोलिस उपनिरीक्षक अशोक खेडकर यांची गोंदिया येथून जळगाव शहर येथे.
रायगड चे पोलिस उपनिरीक्षक अविनाश राठोड यांची रावेर येथे.
जिल्हापेठ चे पोलिस उपनिरीक्षक शांताराम देशमुख यांची पाचोरा येथे.
यावल चे पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे यांची रावेर येथे.
चाळीसगाव ग्रामीण चे पोलिस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण यांना एक वर्ष मुदतवाढ.
पाचोरा चे पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे यांना एक वर्ष मुदतवाढ.
पोलिस उपनिरीक्षक सुनील चौधरी. वाचक अपोअ, जळगाव यांना एक वर्ष मुदतवाढ.
पोलिस उपनिरीक्षक मकसूद बशीर शेख . तक्रार अर्ज शाखा. याना एक वर्ष मुदतवाढ
पोलिस उपनिरीक्षक प्रिया दातीर शनीपेठ पोलिस स्टेशन यांना एक वर्ष मुदतवाढ. पोलिस उपनिरीक्षक समाधान गायकवाड (वाचक उपअधीक्षक, जळगाव) याना अमळनेर येथे.
चार अधिकार्यांच्या विनंती बदल्या
पोलिस उपनिरीक्षक नंदकिशोर काळे . भुसावळ तालुका यांची मुक्ताईनगर येथे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र चाटे . मुक्ताईनगर. यांची भुसावळ तालुका .
पोलिस उपनिरीक्षक मंगळू बेंडकोळी बाजारपेठ पोलीस स्टेशन यांची वरणगाव येथे. तर
चोपडा शहराचे पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांची जळगाव गुन्हे शाखा येथे बदली करण्यात आली आहे.

