HSRP नंबर प्लेट साठी पुन्हा मुदतवाढ,” या ” तारखे पर्यंत बसविता येणार नंबर प्लेट
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | वाहनावर HSRP पाटी बसविण्यासाठी यापूर्वी १५ ऑगस्टपर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती. राज्यात जवळपास ६० ते ७० वाहनांना पाटी लागली नसल्याने या वाहनांना आता दंड भरावा लागणार होता.
मात्र आता नंबर प्लेट लावली नसलेल्या वाहन धारकांना मोठा दिलासा मिळाला असून HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी आता ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
अनेक वाहनधारकांनी अजूनही HSRP नंबर प्लेट बसवलेली नाही, त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे.आता ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाहनांना HSRP नंबर प्लेट (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) बसविता येणार आहे.

