भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

फैजपूरयावल

आनंदाची बातमी : मधुकरच्या शेतकऱ्यांना दिवाळीची भेट ; 252 शेतकऱ्यांच्या खात्यात 7.87 लाख जमा होणार

जळगाव. मंडे टू मंडे न्यूज. मिलिंद कानडे || यावल तालुक्यातील मधुकर सहकारी साखर कारखाना लि. च्या शेतकरी सभासदांसाठी आनंदाची बातमी असून, कारखान्याने सन 2011-12 ते 2015-16 या कालावधीत कपात केलेल्या ठेवी परताव्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. शासनाने स्थापन केलेल्या समितीची सभा सोमवार, दिनांक 2 नोव्हेंबर 2026 रोजी पार पडली. या सभेत चौथ्या टप्प्यातील 252 शेतकऱ्यांना एकूण 7 लाख 87 हजार रुपयांचा परतावा देण्यासंदर्भातील धनादेश स्वीकारण्यात आला.

दिनांक 14 ऑगस्ट 2026 ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याचा तपशील जमा केला होता, अशा एकूण 252 शेतकऱ्यांच्या खात्यात सदर रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित शेतकरी सभासदांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

यापूर्वी एकूण 23,122 शेतकऱ्यांपैकी 6,532 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 3 कोटी 9 लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. आता चौथ्या टप्प्यातील 252 शेतकऱ्यांचा समावेश झाल्याने परताव्याच्या प्रक्रियेत आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण झाला आहे.

ज्या शेतकरी सभासदांनी अद्याप आपल्या बँक खात्याचा तपशील जमा केलेला नाही, त्यांनी लवकरात लवकर आवश्यक तपशील जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या सभेस श्री. विशाल जाधवर, प्रादेशिक सहसंचालक (साखर), छत्रपती संभाजीनगर, श्रीमती भारती ठाकूर, समिती अध्यक्ष तथा प्रादेशिक उपसंचालक, श्री. अरविंद नीचळ, द्वितीय विशेष लेखापरीक्षक, जळगाव, नीलेश राणे, ललित बोंडे तसेच मधुकर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक रत्नदीप वायकोळे उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!